Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकऊमराळे बु. ग्रामपंचायत निवडणूक : पारंपारिक ग्रामविकास पॅनल व जनसेवा पॅनल समोरासमोर

ऊमराळे बु. ग्रामपंचायत निवडणूक : पारंपारिक ग्रामविकास पॅनल व जनसेवा पॅनल समोरासमोर

ओझे | विलास ढाकणे | Oze

एकेकाळी दिंडोरी (Dindori) तालुक्याची राजधानी म्हणून नावलौकिक असलेल्या ऊमराळे बु: ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक (Election) रविवार दि.१८ डिसेंबर रोजी होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून अखेरपर्यंत प्रयत्न झाले…

- Advertisement -

परंतु फक्त ग्रामविकास पॅनलचे एक उमेदवार गणपत सुकदेव भोये बिनविरोध विजयी झाले तर उर्वरित सर्व जागांवर निवडणूक लागली. ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व कादवा सहकारी साखर कारखाना व ऊमराळे बु: सोसायटी संचालक सुनील केदार,ऊमराळे बु: सोसायटीचे ज्येष्ठ संचालक शशिकांत गामने,ऊमराळे बु: सोसायटी चेअरमन अधिकराव केदार, युवा नेते प्रविण उर्फ पप्पु केदार,योगेश धात्रक करत आहेत.

तर जनसेवा पॅनलचे नेतृत्व कादवा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक जे डी केदार, दिंडोरी कृ.ऊ.बाजार समितीचे माजी संचालक रामदास धात्रक, दिंडोरी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक डॉ. पुंडलिक धात्रक करत आहेत.

कादवा सहकारी साखर कारखाना व ऊमराळे बु: सोसायटीच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा तेच पारंपारिक विरोधक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत समोरासमोर ऊभे ठाकले आहेत.थेट सरपंच निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचे कांतीलाल संतु रहेरे तर जनविकास पॅनलचे वसंत पंढरीनाथ भोये यांच्यात थेट लढत आहे.

थेट सरपंच पदाला गणेश जाधव व आकाश चारोस्कर हे अपक्ष ऊभे आहेत. सदस्य पदाकरिता ग्रामविकास पॅनलचे रमेश मुरलीधर केदार,रमेश (आबा) उत्तम केदार,दिनकर संजय जाधव, इंदुबाई बाळु पताडे, विशाखा सम्राट पगारे, बाळु पोपट वनकर, कलाबाई कृष्णा पवार, हिराबाई पुंडलिक रहेरे, पुनम किरण भोई, आशा योगेश धात्रक उमेदवार आहेत तर जनसेवा पॅनलचे संजय भिकाजी केदार, नवनाथ सदाशिव धात्रक,काळुबाई रामचंद्र माळेकर, बेबीबाई संजय सोनवणे, अनिता प्रकाश अहिरे, बापु निवृत्ती टोंगारे,शकुबाई बाबुराव कडाळी, जनाबाई वसंत भोये, किसन सुका कडाळी, भारती विलास केदार हे उमेदवार आहेत.सदस्य पदाकरिता अपक्ष म्हणुन लिलाबाई जयवंत पगारे नशिब अजमावत आहेत.

विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक गाजणार असुन रस्ते,स्वच्छ पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य, सुलभ शौचालये, सुरळीत विज पुरवठा याबरोबरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीला एच ए एल च्या सी एस आर फंडामधून केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांमधुन मिळालेले १ कोटी ७५ लाख रुपये तसेच माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी जि. प. शाळेच्या इमारतीला व नळ पाणीपुरवठा योजनेला मिळवुन दिलेला निधी सुध्दा या निवडणुकीत प्रचारात येत आहे.

ग्रामविकास पॅनलचे नेते सुनील केदार व जनविकास पॅनलचे नेते जे डी केदार हे विकासाच्या मुद्यांवर दावे प्रतिदावे करत असुन रविवार दि.१८ रोजी होणाऱ्या मतदानात कोण बाजी मारणार याकडे दिंडोरी तालुक्याचे लक्ष लागले आहे. एकंदरीत कादवाच्या आजी माजी संचालकांची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या