Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशकोरोनाची लस आली : इंग्लडमध्ये पुढील आठवड्यात लसीकरण

कोरोनाची लस आली : इंग्लडमध्ये पुढील आठवड्यात लसीकरण

नवी दिल्ली

अखेरी ज्याची प्रतिक्षा गेल्या आठ, नऊ महिन्यांपासून होती, ती बातमी मिळाली आहे. इंग्लडने फायजर व बायोएनटेकच्या (Pfizer-BioNTech COVID-19 vaccine) लसीला मंजुरी दिली आहे. आता पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये ही लस उपलब्ध होणार आहे. लसीला मंजुरी देणारा इंग्लड हा पहिला देश झाला आहे.

- Advertisement -

ब्रिटनने फायझर आणि बायोएनटेकच्या लसीला सर्वात आधी मंजुरी दिली. आता ७ डिसेंबरपासून या लशीची डिलीव्हरी सुरू होईल. अमेरिकेच्या एफडीएची एक बैठकही 10 डिसेंबरला होणार असून या बैठकीत लशीला तातडीची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अॅलर्जी अॅण्ड इंफेक्शियस डिसीजचे प्रमुख अँथनी फाँसी यांनी सांगितले, ‘डिसेंबर महिना संपायच्या आतच लसीकरण सुरू करण्यात येईल. मेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या