Wednesday, April 24, 2024
Homeजळगावरोटवदनजिक दुचाकीचा अपघात : पती जागीच ठार, पत्नी जबर जखमी

रोटवदनजिक दुचाकीचा अपघात : पती जागीच ठार, पत्नी जबर जखमी

धरणगाव Dharangaon (प्रतिनिधी) :

येथून जवळच असलेल्या रोटवद (Rotwad) गावाजवळ डिजेच्या टेम्पोने (tempo) धडक दिल्याने मोटारसायकल स्वार (Motorcycle rider) जागीच ठार (kill) झाला. त्याचे सोबत असलेली पत्नी जबर जखमी असून त्यांचेवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की सुभाष आनंदा माळी (रा शिरपूर) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, २३ जानेवारी रोजी ०३.४५ वा चे सुमारस त्यांचे काका नामे दशरथ फुलचंद माळी यांनी त्यांचे घरी येवुन सांगीतले की, त्यांचा मोठा भाऊ नामे देवबा आंनदा माळी व वहिणी नामे ज्योती माळी यांचा धरणगाव चोपड़ा रोडवर, रोटवद गावापुढे अपघात झाला आहे व सदर अपघातात, मोठा भाउ नामे देवबा माळी मयत झाले.

हे ऐकून ते, काका नामे दशरथ माळी, कैलास पंडीत महाजन, खेमचंद दशरथ महाजन, प्रविण गिरधर माळी, प्रकाश सुकलाल माळी, मनोज देवबा माळी असे धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे हजर झाले. त्यावेळी त्यांची वहिणी नामे ज्योती देवबा माळी यांचे हातास व कमरेस मुक्का मार लागल्याचे समजले. त्यांनी सांगीतले की, आज दि. २३ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ०१.०० वा चे सुमरास लग्न लागुन ते हिरो पॅशन प्रोमो सा क्र एम. एच. १८ बीक्यु ७८४१ ने शिरपुरला घरी जाण्याकरीता निघाले होते. त्यानंतर दुपारी ०३.४५ वाचे सुमारास रोटवद गावापुढे, चोपडा रस्त्यास मागुन येणाऱ्या एक बॅन्जोची गाडीने त्याचे मोटर सायकलला मागुन धडक दिली व त्यामध्ये देवबा आंनदा माळी व त्या खाली पडल्या.

सदर अपघातात देवबा माळी यांचे डोक्यास पायास मार लागुन दुखापत झाली. त्यांना ग्रामीण रुग्णालय, धरणगाव येथे उपचारकरीता आणले असता दाखल पुर्व मयत घोषीत केले गेले. त्यानंतर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्याकरीता गेले असता सदर बॅन्जो टॅम्पो गाडी वरिल चालक हा पोलीस स्टेशन येथे स्वत हुन हजर झाल्याने, तो चालवत असलेली बॅन्जोची गाडी टाटा कंपनीचा टॅम्पो क्र एमएच ४३ एडी ०१७५ आणली होती. सदर बॅन्जो गाडीवरील चालकाचे नाव शालिक देविदास कोळी (वय ३६ वर्ष, रा. हिंगोणे पोस्ट. जळोद ता. अमळनेर जि. जळगाव) असल्याचे समजले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या