Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशकात २ हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरु

नाशकात २ हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरु

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ८१७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ३५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ४४ ने घट झाली आहे…

- Advertisement -

आत्तापर्यंत १ हजार ९५० रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण असे

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १९६, चांदवड ३०, सिन्नर १६०, दिंडोरी ८८, निफाड ६१, देवळा २९, नांदगांव ५३, येवला १९, त्र्यंबकेश्वर २२, सुरगाणा ०६, पेठ ००, कळवण ३९, बागलाण १५४, इगतपुरी १५, मालेगांव ग्रामीण १४ असे एकूण ८८६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहेत.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार २९०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५९ तर जिल्ह्याबाहेरील १७ असे एकूण २ हजार ३५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ९ हजार ११९ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी अशी

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ८१७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ३५२ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ४४ ने घट झाली आहे.

आत्तापर्यंत १ हजार ९५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ९४.८५, टक्के, नाशिक शहरात ९६.८५ टक्के, मालेगाव मध्ये ९२.६७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.३५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ इतके आहे.

जिल्ह्यातील रुग्ण दगावल्याची आकडेवारी अशी

नाशिक ग्रामीण ७५८ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ९६९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७४ व जिल्हा बाहेरील ४९ अशा एकूण १ हजार ९५० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या