Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; दोन जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; दोन जखमी

बेलगाव कुऱ्हे | Belgaon Kurhe

मुंबई-आग्रा महामार्ग (Mumbai-Agra Highway) जनावरे, भटके कुत्रे आणि खड्ड्यांमुळे अत्यंत असुरक्षित बनला आहे. यावर प्रशासन ठोस उपाययोजना करत नसल्याने रोजच अपघात (Accident) घडत आहेत…

- Advertisement -

आज सकाळी गोंदे दुमालाकडून (Gonde Dumala) घोटीच्या (Ghoti) दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलला मुंढेगावजवळ (Mundhegaon) अचानक बैल आडवा आल्याने अपघात झाला.

या अपघातात एमएच १५ ईके ४६७८ क्रमांकाच्या मोटारसायकलवरील शाळकरी मुलगा कृष्णा विलास शिंदे (१३) व भारत भानुदास शिंदे (२७) रा.वंजारवाडी हे दोघे जखमी झाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम रुग्णवाहिकेच्या (Ambulance) मदतीने जखमींना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या