बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालक जखमी

jalgaon-digital
1 Min Read

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

हरिहर किल्ला, कळमुस्ते दुगारवाडी या शिवारात मोडणाऱ्या व दुगारवाडी धबधब्याजवळ (Dugarwadi waterFall) असणाऱ्या जंगलात बिबट्याने (Leopard) मुक्काम ठोकला आहेत…

दुगारवाडी येथे आज पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालक जखमी झाले आहेत. या बालकांना नाशिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे परिसरात मोठी घबराट पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दुगारवाडी पाडा येथे आज पहाटे 6 वाजेच्या बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली. भिवाजी गोविंद सोहळे (12), विशाल मुरुम (8) हे दोघे पहाटे 6 वाजता घराबाहेर आल्यावर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. मात्र त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने जंगलात धूम ठोकली.

दोघांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वन विभागाने (Forest Department) तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वन परिमंडळ अधिकारी त्र्यंबक दीपक राजभोज यांनी या हल्ल्याची नोंद वनखात्याने घेतल्याचे सांगत परिसरात पिंजरा बसवण्यासाठी वरिष्ठांना अहवाल दिल्याचे त्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *