Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकइगतपुरीत घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक

इगतपुरीत घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक

इगतपुरी । Igatpuri

घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाकडुन जेरबंद झाले आहेत.

- Advertisement -

या बाबत सविस्तर माहिती अशी की, फेब्रुवारी महिन्याच्या १४ व १५ तारखेला इगतपुरी शहरातील रहिवासी हरी गुलाब वीर, रा. सहा बंगला, आठ चाळ, इगतपुरी हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते.

त्यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, एक सॅमसंग LED टिव्ही, २ गॅस सिलेंडर, १ पाण्याची मोटर असा एकूण १ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला होता. सदर घटनेबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे तपासात आरोपींचा शोध घेत असतांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त बातमीवरून इगतपुरी शहरातील संशयीत राहुल बाळासाहेब घेगडमल (३६ फुलेंनगर, आटचाळ, इगतपुरी), रोहीत अशोक बागुल( २१ फुलेंनगर, आटचाळ, इगतपुरी) यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी फेब्रुवारी महिन्यात इगतपुरी शहरातील आठचाळ परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

सदर आरोपींचे कब्जातून वरील गुन्ह्यात चोरीस गेलेला सॅमसंग LED टिव्ही, २ गॅस सिलेंडर, १ पाण्याची मोटर, १ ऑर्गन असा ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी इगतपुरी पोलीस ठाणेस हजर करण्यात आले.

सदर गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, सपोउनि नवनाथ गुरुळे, पोहवा शिवाजी जुंदरे, बंडू ठाकरे, पोना संदीप हांडगे, जालिंदर खराटे, पो कॉ सचिन पिंगळ यांचे पथकाने गुन्हा उघडकीस आणला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या