Friday, April 26, 2024
Homeनगरकट्ट्यासह दोघांना अटक

कट्ट्यासह दोघांना अटक

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

गावठी कट्टा जवळ बाळगणार्‍या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. मयुर आण्णा क्षिरसागर (वय- 22 रा. कल्याण रोड, नगर) व आशिष दिनेश गायकवाड (रा. दिल्ली गेट, नगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्याकडून गावठी कट्टा, दुचाकी व दोन मोबाईल असा एक लाख पाच हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. त्यांच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक शाहीद शेख यांनी फिर्याद दिली आहे. माळीवाडा बस स्थानक परीसरातील जिल्हा परीषद कार्यालयाच्या बाहेर कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.

- Advertisement -

दोन इसम त्यांच्या दुचाकीवरून माळीवाडा परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांना मिळाली होती. त्यांनी त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांना सोबत घेऊन जिल्हा परीषद कार्यालयाच्या बाहेर सापळा लावला. दोन संशयित इसम दुचाकीवरून येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा मिळून आला. पोलिसांनी तो जप्त करून त्यांची दुचाकी व दोन मोबाईल जप्त केले. त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस नाईक गाडगे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या