Thursday, April 25, 2024
Homeनगरमहिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न; हरेगावच्या आरोपीला सात सक्तमजुरी

महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न; हरेगावच्या आरोपीला सात सक्तमजुरी

अहमदनगर|Ahmedagar

जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill), अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये एकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) दोषी धरून सात वर्षे सक्त मजुरी व 35 हजार रूपये दंड अशी शिक्षा (Punishment Such as Hard Labor and Fines) ठोठावली आहे. तसेच या घटनेतील फिर्यादी यांना 30 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने (Court) दिले आहे. आसिफ कबीर पठाण (रा. हरेगाव ता. श्रीरामपूर) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी हा निकाल दिला.

- Advertisement -

या घटनेतील फिर्यादी या 2 फेब्रुवारी 2020 रोजी तिच्या बहिणीच्या आजारी मुलाला भेटण्यासाठी पढेगाव (Padhegav) येथे जाण्यासाठी बेलापूर (Belapur) रिक्षा स्टँडवर गेल्या होत्या. त्यावेळी आसिफ पठाण याने फिर्यादीशी खोटे बोलून त्यांना त्याच्या दुचाकीवर बसविले व राहुरी विद्यापीठ (Rahuri University) परिसरात आणले होते. तेथे पठाण याने फिर्यादीवर सत्तुरने हल्ला (Attack) करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केले होते.

याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला होता. तपासी अधिकार्‍यांनी तपास पुर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात एकुण सहा साक्षीदार तपासण्यात आले. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, उपनिरीक्षक राक्षे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी-पुराव्यानुसार आरोपीला वरील प्रमाणे शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकिल अनिल डी. ढगे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी डी.डी.ठुबे यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या