Friday, April 26, 2024
Homeनाशिकत्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी आढळले भव्य वाड्याचे अवशेष; जाणून घ्या इतिहास

त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी आढळले भव्य वाड्याचे अवशेष; जाणून घ्या इतिहास

नाशिक । Nashik

जिल्ह्यातील ऐतिहासक वारसा असलेला त्रिंगलवाडी किल्ला (Tringalwadi Fort) हा निसर्ग पर्यटननाने (Nature tourism) सजलेला असून आपल्या प्राचीनतेची आणि इतिहासाची साक्ष देत उभा आहे. याच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लेणी (Caves) पासून साधारण ८०० मीटर अंतरावर गर्द झाडीत एक वाडा (wada) पडक्या स्थितीत असून या वाड्याला कोणत्याही भिंती नाहीत.

- Advertisement -

तसेच पर्यटकांपासून (Tourists) हा वाडा नेहमी दुर्लक्षित राहिला असून जवळपास १०० X १०० लांब रुंदीचा हा वाडा असल्याने त्याच्या चारही बाजूला बुरुज (Tower) आहेत. बुरुजाची उंची ६ फुट एवढी आहे. तर मध्यभागी मोठा चौथऱ्याच्या खुणा आहेत. हा एखाद्या सरदाराचा वाडा असावा असे प्राथमिक स्वरुपात आढळते. स्थानिक यास हत्ती महल असे म्हणतात.

दुसरीकडे नाशिक जिल्हा (Nashik District) हा गीरीदुर्गांच्या सोबत आव्हानात्मक सुळके, लेणी, धारातीर्य स्थळ, मंदिरे, बारव अशा विविधतेने नटलेला आहे. त्यातीलच त्रिंगलवाडी किल्ला हा निसर्गरम्य असून या किल्ल्यावर पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लेणीमुळे किल्ल्याचे वास्तव प्राचीनतेशी जोडले गेले आहे.

पूर्वी नालासोपारा-कल्याण-कसारा-अंजनेरी (नाशिक) हा व्यापारी मार्ग (Trade route) होता. या मार्गावर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून लेणीसाठी दाने दिली जायची म्हणून येथे ही लेणी कोरलेली आहे. इ.स.१८१८ नंतर इंग्रज राजवटनंतर पुढे नव्याने बांधण्यात आलेल्या धरणांमुळे (dams) या मार्गात मोठे बदल झाले. त्यामुळे त्याकाळात व्यापारी मार्गावर त्रिंगलवाडी किल्ला हा टेहळणीचे प्रमुख ठिकाण असावे.

किल्ल्यावरील दुर्ग अवशेषात पडक्या वाड्याचे अवशेष, कातळातील तुटलेल्या पायऱ्या, कातळात कोरलेले प्रवेशद्वार व पाच फुटाची हनुमानाची मूर्ती, बुरजांचे अवशेष पहायला मिळतात. नुकताच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (Sahyadri Pratishthan Hindusthan) या संस्थेने लोकवर्गणीतून सागवानी प्रवेशद्वार लावले आहे.

असा आहे त्रिंगलवाडी किल्ल्याचा इतिहास

त्रिंगलवाडी (Tringalwadi) किल्ल्याला तीरमकुल किल्ला (Tiramkul Fort) असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात (historical documents) आढळतो. जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली लेणी ही शेवटच्या टप्प्यातील लेणी आहे.

लेणीतील शिलालेखावरून (Cave inscriptions) लेणी शके १२६६ मध्ये १३व्य शतकात कोरली गेली असे दिसते. तसेच किल्ल्यावर हि दोन लेण्या आहेत. कळवण तालुक्यातील (Kalvan taluka) मार्केंडेय पिंपरी येथील मूळचे असलेले कवि जयराम पिंड्ये (Poet Jayaram Pindye) यांच्या ‘पर्णाल-पर्वत-ग्रहणाख्यान’ या काव्यात त्रिंगलवाडीचा उल्लेख आलेला दिसतो.

इ. स.१६३६ पासून हा किल्ला शहाजी महाराज व छत्रपती शिवाजींच्या (Shahaji Maharaj and Chhatrapati Shivaji Maharaj) ताब्यात असल्याचे कॅप्टन ब्रिग्जने (Captain Briggs) आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला असून इ.स. १६८८ च्या शेवटी मोघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.

मातब्बरखानाने औरंगजेबाला पाठविलेल्या पत्रात त्रिंगलवाडीला वेढा घातल्याची नोंद आढळते.तर पेशवेकाळात (Peshwa period) हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. इ.स. १८१८ साली पेशवाई बुडाल्यावर मराठ्यांनी (Marathas) पुन्हा प्रतिकार करू नये म्हणून इंग्रज अधिकारी (English officer) कॅप्टन ब्रिग्जने (Captain Briggs) तोफा डागून व सुरूंग लावून हा किल्ला उद्धवस्त केला.

संकलन : श्री.गणेश द. रघुवीर

दुर्ग अभ्यासक

सदस्य-सह्याद्री प्रतिष्ठान

- Advertisment -

ताज्या बातम्या