Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकत्र्यंबकच्या 'या' नगरसेवकाचे पद रद्द

त्र्यंबकच्या ‘या’ नगरसेवकाचे पद रद्द

नाशिक । Nashik

नगरसेवक पदावर असताना शासकिय ठेका चालविल्या प्रकरणी दोषी आढळल्याने त्र्यंबकेश्वरचे नगरसेवक स्वप्नील शेलार यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी ही कारवाई केली.

- Advertisement -

शेलार यांच्याकडे २०१० ते १३ या कालावधीत शासकिय ठेका होता. त्यास २०१३ ते १६ व २०१६ ते १९ अशी वाढ देण्यात आली होती. दरम्यान २०१७ मध्ये त्र्यंबकेश्वर नगरपालिकेची निवडणूक झाली. त्यात शेलार हे भाजपकडून प्रभाग ५ मधुन नगरसेवक म्हणून निवडूण आले.

नगरसेवक पदावर असताना शासकिय ठेका नियमानूसार चालवता येत नाही व निवडणूकही लढवता येत नाही. निवडणूक लढवितांना शेलार यांच्यावर कोणी या प्रकरणी हरकत घेतली नव्हती. मात्र निवडून आल्यावर सामाजिक कार्यकर्ते पाठक बाबा यांनी हरकत घेतली.

या प्रकरणाची अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडे सुनावणी सुरु होती. या प्रकरणात शेलार दोषी आढळल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या