Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedफेसबुकच्या माध्यमातून तरुणाला 40 हजाराचा गंडा 

फेसबुकच्या माध्यमातून तरुणाला 40 हजाराचा गंडा 

औरंगाबाद – Aurangabad

फेसबुकवर (Facebook) जुनी दुचाकी विक्रीची जाहिरात पाहिल्यावर खरेदी करण्यासाठी तरुणाने भामट्याशी संपर्क साधला. तरुणाशी संपर्क होताच भामट्याने त्याला (WhatsApp) व्हाॅटसअपवर फोटो व दुचाकी पाठविण्याचे आमिष दाखवून तरुणाला चाळीस हजारांचा गंडा घातला. हा प्रकार एन-2 सिडको (Aurangabad Cidco) भागात घडला.

- Advertisement -

पंजाबसिंग दिवाकरसिंग (31, रा. न्यू एसटी कॉलनी, सिडको, एन-2) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिंग याने 22 डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास मोबाइलच्या फेसबुकवर जुनी दुचाकी विक्री असल्याची जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीत दुचाकी (एमएच-03-डीबी-7880) विक्रीला असल्याचे नमूद करण्यात आले होते. ही जाहिरात पाहून त्यावरील नमूद मोबाइल क्रमांकावर सिंग याने संपर्क साधला.

समोरील भामट्याशी चर्चा केल्यावर त्याने सिंग यांच्या व्हाटसअपवर दुचाकीचा फोटो पाठवला. फोटो पाहिल्यानंतर सिंग यांना दुचाकी पसंत पडली. त्यावरुन दोघांमध्ये 21 हजारात दुचाकी खरेदी करण्याचा व्यवहार झाला. या व्यवहारानंतर सकाळी दहाच्या सुमारास भामट्याने पुन्हा सिंगशी संपर्क साधून तीन हजार 150 रुपये (Google Pay) गुगल पेवर पाठविण्यास सांगितले. भामट्यावर विश्वास ठेऊन सिंग यांनी गुगल पेवर पैसे पाठवले. पुढे भामट्याने दुचाकी पाठविण्याचे आमिष दाखवले. मात्र, दुचाकी न पाठवता भामट्याने पुन्हा दुपारी दोनच्या सुमारास सिंग यांच्या मोबाइलवर संपर्क साधत 11 हजार पाचशे रुपयांची मागणी केली. तसेच त्याशिवाय दुचाकी मिळणार नाही, असेही त्याने ठासून सांगितले. त्यामुळे सिंग यांनी भामट्याला मागणीनुसार पैसे पाठवले.

मात्र, थोड्या वेळातच भामट्याने पैसे मिळालेच नाही, असे सांगितले. काही वेळातच सिंग यांच्या खात्यातून दोन टप्प्यात 24 हजार 850 रुपये भामट्याच्या खात्यावर जमा झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे सिंग यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, भामटा दुचाकी देईल या विश्वासावर सिंग यांनी पोलिसात तक्रार नोंदवली नव्हती. अखेर सिंग यांनी मुकुंदवाडी पोलीस (Police) ठाणे गाठत फसवणूकीची तक्रार दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या