Friday, April 26, 2024
Homeनाशिकऐकावं ते नवलंच! सामाजिक अंतर पाळत जंगलात थाटल्या झोपड्या; गावात शिरकाव तर...

ऐकावं ते नवलंच! सामाजिक अंतर पाळत जंगलात थाटल्या झोपड्या; गावात शिरकाव तर आतापर्यंत एकही आदिवासी बाधित नाही

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्ह्यात करोनाचा फैलाव वाढतच आहे. रोज हजारोंच्या संख्येत रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. ग्रामीण भागात शिरकाव झालेल्या जिल्ह्यात असे एक गाव आहे, ज्या गावातील आदिवासींनी करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावातील घराला टाळे ठोकत जंगलात वास्तव्याचा मार्ग निवडला. त्यामुळे संपर्क कुणाचा झाला नाही. परिणामी याठिकाणी करोनाचा एकही रुग्ण बाधित आढळून आलेला नाही…

- Advertisement -

चांदवड तालुक्यातील अमरापूर हट्टी या धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातील ही घटना आहे. गावात पक्की घरे या आदिवासींची आहेत. मात्र, गावात बाहेरच्या शहरातून अनेकजन येतात. त्यांच्यामुळे आपल्याला संसर्ग होऊ नये यासाठी या गावातील आदिवासी मंडळीने ओसाड असलेल्या शेतात जागोजागी झोपड्या साकारल्या.

झोपडीपर्यंत जायला निट रस्तादेखील नाही. त्यामुळे याठिकाणी कुणाचेही येणे-जाणे नाही. तसेच एकाच ठिकाणी झोपड्या न बांधता ठराविक अंतरावर या झोपड्या आहेत. त्यामुळे एका घरातून दुसऱ्या घरात येण्याजाण्याचाही प्रश्न उद्भवत नाही.

करोनापासून वाचण्यासाठी सामाजिक अंतर पाळले गेले पाहिजे असे अनेकदा आवाहन केले जाते. या आवाहनास शहरी भागात वाटण्याच्या अक्षता दिल्या जातात. मात्र, ग्रामीण भागातील या आदिवासी मंडळीने जंगलात झोपड्या करून स्वत:च्या कुटुंबाला विलगीकरणातच ठेवले आहे.

या गावात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर धास्तीने अनेक ग्रामस्थांचे जीव गेले. अनेकजन आजाराशी दोन हात करत आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या या आदिवासींनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी जी शक्कल लढवली आहे, ती वाखाणन्याजोगी अशीच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या