रात्री आठनंतरही व्यवहार सुरू, डेअरीसह हॉटेल चालकावर गुन्हा

jalgaon-digital
1 Min Read

धुळे । प्रतिनिधी Dhule

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे रात्री आठनंतर व्यवहार बंद ठेवण्याचे प्रशासनाने निर्देश दिले असतांना दुध डेअरीसह हॉटेल सुरू ठेवल्यामुळे दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने रात्री आठ वाजेनंतर वैद्यकीय सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतू तरीही अनेक व्यावसायीक नेहमीप्रमाणे दुकान सुरू ठेवतात. तर काही बाहेरून दुकानाचे शटर खाली करून आत व्यवहार सुरू ठेवून आदेशाचा अवमान करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, चाळीसगाव रोडवरील रूंदावन कॉम्पलेक्समधील अमोल फरसाण व दुधडेअरी व हे दुकान काल रात्री आठनंतर सुरू होते.

याप्रकरणी पोकाँ शोएब बेग यांच्या तक्रारीवरून दुधडेअरी चालक अमोल अवडु गवळी (वय 30 रा. राजवाडे नगर, चाळीसगाव रोड, धुळे) याच्याविरूध्द आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तर चाळीसगाव रोड पोलिसांच्या पाहणीत रेल्वे स्टेशनजवळील सुपर सम्राट हॉटेल रात्री आठनंतर सुरू दिसून आली. याप्रकरणी पोकाँ चेतन झालेकर यांच्या तक्रारीनुसार हॉटेल चालक रफिक दादुभाई शेख (वय 66 रा. गरिबनवाज नगर, धुळे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *