Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर- डहाणू रेल्वे पुन्हा धूळखात

त्र्यंबकेश्वर- डहाणू रेल्वे पुन्हा धूळखात

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

केंद्रिय अर्थसंकल्पात त्र्यंबकेश्वर – डहाणू रेल्वेमार्गाकडे (Trimbakeshwar- Dahanu Railway Route )लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा धुळखात पडला आहे. डहाणू रेल्वे बाबत नव्याने फेर सर्वेक्षणाचा साधा ही विचार केला गेला नाही. त्यामुळे जनतेत नाराजीचा सुर आहे.खासदार, आमदार, मंत्री यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

पूर्वी त्र्यंंबकेश्वर डहाणू लोकसभा मतदारसंघाला जोडलेले होते. रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करून नकाशा तयार करण्यात आला. या मार्गाची मागणी होत आहे. या मार्गामुळे त्र्यंंबकेश्वर गुजरातला जोडले जाईल. सौराष्ट्र – त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग भाविकांना एकाचवेळी दर्शनाला जाता येता येणार आहे, अशा या मार्गाची संकल्वना होती.

आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरीजी महाराज यांनी कुंभमेळा रेल्वेने जोडावी अशी मागणी केलेली आहे. त्र्यंबकेश्वर ते डहाणू मार्गाची ही मागणी रास्त असतानाही केवळ मोठे राजकीय पाठबळ नसल्याने वरील मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या