Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे : पर्यटनस्थळे बंद

पुणे : पर्यटनस्थळे बंद

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिला आहे.

- Advertisement -

लोणावळ्यातील भुशी धरण व लोणावळा परिसरातील इतर पर्यटनस्थळांप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण व ताम्हिणी घाटाचा परिसर, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण व गडकिल्ले परिसर, वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण व परिसर यावर्षी बंद ठेवण्यात येणार आहेत.
भुशी धरणासह पुणे जिल्ह्यातील वरिल धरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी शनिवार व रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. धरण परिसरात अनेक पर्यटकांचे बुडून मृत्यू होतात.

कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. धरण क्षेत्रात पाऊस जास्त होत असल्याने धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग वाढविला जातो व पर्यटक वाहून जाण्याच्या घटना घडतात. यावर्षी देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भुशी धरण व लोणावळा परिसर तसेच पुणे जिल्ह्यातील वरील सर्व धरण क्षेत्रांचा परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

आदेशाचे उल्लंघन करणार्‍यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड सहिता 1860च्या कलम 188 अन्वये कारवाई केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या