पर्यटनामुळे नाशिकच्या अर्थव्यवस्थेला भरारी

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | अनिरुद्ध जोशी | Nashik

गेल्या दीड वर्षांपासून करोना विषाणूने (corona virus) थैमान घातल्याने लहानांपासून तर अबालवृद्धांपर्यंत सर्वच घरात बंदिस्त झाले होते. त्यामुळे पर्यटन क्षेत्र (tourism) मंदावले होते. मात्र आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शहरातील अनेक नागरिक आपल्या कुटुंबियांसोबत विरंगुळा म्हणून सहलीसाठी जाण्याचे नियोजन करीत आहेत.

यामुळे दोन वर्षांपासून पर्यटन क्षेत्राच्या (tourism sector) थांबलेल्या अर्थचक्राची चाके फिरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नाशिकच्या (nashik) अर्थव्यवस्थेला (economy) आधिकची भरारी मिळणार आहे. करोना आधी फिरायला जायचे म्हटले की, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बेत आखले जायचे.

कुटुंबीयांसोबत फिरायला जायचे प्रमाण कमी होते. तसेच आलिशान हॉटेल (hotels), रिसोर्टला (resort) पसंती दिली जात होती. परंतु आता पर्यटनाचे चित्र काहीसे बदलताना दिसून येत आहे. आता किल्ले (fort), धरण (dam), कृषी पर्यटन (agri-tourism), पर्वतावर जाऊन कुटुंबीयांसोबत मनमुराद आनंद लुटताना दिसून येत आहेत.

या परिसराला पसंती

करोनामुळे दुरावलेल्या अनेक परिवार आता पर्यटनाला जात आहेत. प्रामुख्याने सोमेश्वर (someshwar), रामशेज किल्ला (ramshej fort), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) परिसर, इगतपुरी (igatpuri), बोट क्लब (boat club), गंगापूर (gangaour dam), कश्यपी धरण (kashyapi dam), पांडवलेणी (pandav leni), साल्हेर-मुल्हेर, धोडप किल्ला (dhodap fort), सप्तशृंगीगड (saptashrungi gad), नांदूरमध्यमेश्वर (nandurmadhyameshwar) अशा पर्यटन स्थळांना नागरिक अधिक पसंती देत आहेत. तसेच ग्रामीण भागातदेखील कौटुंबिक पर्यटनाला वाव मिळत आहे. यामुळे बाहेरगावी न जाता या ठिकाणांपेक्षा स्थानिक पर्यटन केंद्रांवर यावर्षी गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून वर्क फ्रॉम होम (work from home) सुरु आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून घराबाहेर पडलो नाही. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आम्ही सहकुटुंब इगतपुरी परिसरात जाऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटल

– आदित्य जालिहालकर, नाशिक

आपल्या परिवारासह सहलीला जाण्याची मजा काही वेगळीच असते. नाशकाला निसर्गसौंदर्य लाभल्याने बाहेरगावी न जाता जिल्ह्यातील ग्रामीण भागातच सहकुटुंब पर्यटनासाठी गेलो. बर्‍याच दिवसांनी सहकुटुंब प्रवास केल्याने मानसिक थकवा दूर झाला

– शुभम तायडे, नाशिक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *