Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट, काय झाली चर्चा?

ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट, काय झाली चर्चा?

मुंबई l Mumbai

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारणाऱ्या ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर (Mamata Banerjee Mumbai tour) आहेत.

- Advertisement -

काल ममता बॅनर्जी यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतली (Mamata Banerjee meeting with Shiv Sena leaders) त्यानंतर आज दुपारी ममता बॅनर्जींनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची (Mamata Banerjee Sharad Pawar Meeting) भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते.

या भेटीनंतर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी संयुक्तरित्या माध्यमांना संबोधित केलं. बॅनर्जी म्हणाल्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मी महाराष्ट्रात आले होते. पण ते आजारी असल्यानं त्यांची भेट होऊ शकली नाही. पण त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून त्यांच्या पक्षाचे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना भेटीसाठी पाठवलं. उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना केली. आज ज्या प्रकारे देशात फॅसिझम सुरु आहे, त्याविरोधात सक्षम पर्याय निर्माण झाला पाहिजे पण हे कोणा एकट्याचं काम नाही. जो सक्षम आहे त्याला घेऊन हे करावं लागेल. भाजपविरोधात लढणारा सक्षम पर्याय असायला हवा, कोणी लढायला तयार नाही त्याला आम्ही काय करणार? अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.

शरद पवार म्हणाले की, ‘पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं नातं आहे. सध्याचं राजकारण पाहता नेता रस्त्यावर राहिला तरच विजयी होऊ शकतो असं ममता बॅनर्जींशी चर्चा सुरु असताना लक्षात आलं. त्यामुळे येत्या काळात समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे.’

- Advertisment -

ताज्या बातम्या