Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरथकीत मानधनासाठी झेडपीत थाळीनाद

थकीत मानधनासाठी झेडपीत थाळीनाद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

थकीत वेतन, मानधन, कोविड भत्ता व अन्य मागण्यांसाठी धडकलेल्या मोर्चामुळे नगर जिल्हा परिषदेची सोमवारी सकाळी कोंडी झाली. आयटक आणि आशा संघटना व गटप्रवर्तक संघटनेने हा मोर्चा आणला होता.

- Advertisement -

जिल्ह्यातील काही तालुक्यात सप्टेंबर 2021 ते जानेवारी 2022 अखेर 5 महिन्याचे थकीत वेतन आहे, ते ताबडतोब मिळावे. 2021 पासून राज्य शासनाचे जाहीर केलेले आशा सेविकांचे 2 हजार रूपये व गटप्रवर्तकांना 3 हजार रूपये थकीत आहेत, ते ताबडतोब फरकासह मिळाव. केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2021 पासून बंद केलेला कोविड भत्ता सुरु केला आहे, तो ताबडतोब मिळावा. ऑक्टोबर 2021 पासून गटप्रवर्तकांना 1 हजार200 रूपये व आशांना 1 हजार रूपये व कोविड भत्ता 500 रूपये फरकासह देण्यात यावे.

आशांना अ‍ॅन्ड्रॉईड फोन व स्कुटी मंजूर होऊनही मिळालेली नाही. 1 जुलै 2020 पासून वाढविलेल्या मानधनात कोणतीही कपात करु नये. आशा व गटप्रवर्तक यांचे संप काळातील कपात केलेले मानधन देण्यात यावे. लसीकरण करण्याची सक्ती थांबवावी किंवा त्याचा जादा मोबदला देण्यात यावा. 1 जुलै 2022 पासून 500 रूपये मानधन वाढविण्यात येणार आहे, त्याची तरतूद करण्यात यावी. थकीत मानधन थोडे थोडे अदा न करता संपूर्ण थकीत रक्कम 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत जमा करण्यात यावी व दर महिन्याला 5 तारखेच्या आत पगार करावा, अशी मागणी मोर्चेकरांनी केली. याबाबत 8 फेब्रुवारी 2022 रोजी संघटनांनी प्रशासनाला पत्र दिले होते. त्याचे उत्तर 10 फेब्रुवारी रोजी प्रशासनाने दिले आहे. मात्र, या उत्तराने समाधान झालेले नाही. त्यामुळेच मोर्चाची वेळ आली, असे या संघटनांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या