Tuesday, April 23, 2024
Homeजळगावबनावट वेब साईटच्या माध्यमातून व्यापार्‍याला दिड लाखांचा गंडा

बनावट वेब साईटच्या माध्यमातून व्यापार्‍याला दिड लाखांचा गंडा

चाळीसगाव chalisgaon । प्रतिनिधी

किया मोटर्स प्राय.लिमिटेड (KIA MOTORS PRIVATE LIMITED) या कंपनीच्या नावाने बनावट वेब साईट (Fake website) तयार करून चाळीसगांव येथील व्यापार्‍यास (merchant) 1 लाख 55 हजार रूपयांचा गंडा (Ganda) घालण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला दोघांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोटच्या मुलाचा केला खून, आईसह भाच्याला झाली जन्मठेप

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील पवार वाडी भागातील शांती नगर येथे राहणारे व्यापारी सुरेश सभनदास रावलाणी यांना किया मोटर्स प्राय.लिमिटेड या कंपनीची डिलरशिप मिळविण्यासाठी कागद पत्रांची पूर्तता करण्याचे सांगून अमित कुमार आणि रवि नायर पूर्ण नावे माहित नाही. अशी ओळख सांगणार्‍या दोघा भामटयांनी कंपनीच्या नावाने बनावट वेबसाईट वरून रजिस्ट्रेशन फी म्हणून खाते क्रमांक 110079843357 आयएफसी कोड सीएनआरबी0000659 वर पैसे भरण्यास सांगितले.

लेवा गुजर समाजाची विवाहासाठीची ही आचारसंहिता वाचली का ?बारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : जुनपासून पदवी अभ्यासक्रम राहणार चार वर्षाचा..
प्रियकरासह तिघांच्या मदतीने काढला पतीचा काटा…अन तरुणीसह दोघांवर दाखल झाला गुन्हा

पैसे भरल्यानतंरही डिलरशिप मिळत नसल्याने, सुरेश रावलाणी यांनी वेळोवेळी संबंधीताशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतू तो नसल्याने सुरेश रावलाणी हयांनी 1 लाख 55 हजार रूपये भरले नंतर कंपनीच्या नावाने असलेली ही वेबसाईट बनावट असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी याबाबत चाळीसगांव शहर पोलिस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दाखल केली.

चाळीसगाव पोलीस स्टेशनला त्यांच्या तक्रारीवरुन या दोघा भामटयांच्या विरोधात 420,465,468,469,471/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस हे करीत आहेत.

गद्दारांना जागा दाखविण्याची आली वेळ!पश्चिम रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवांशासाठी ही बातमी आहे महत्त्वाची : अनेक रेल्वेगाडया रद्द

- Advertisment -

ताज्या बातम्या