Thursday, April 25, 2024
Homeनाशिककळवण-नांदुरी मार्गावरील अपघातात तिघे जखमी

कळवण-नांदुरी मार्गावरील अपघातात तिघे जखमी

नांदुरी । Nanduri

कळवण -नांदुरी रस्त्यावर गोबापूर जवळ स्विप्ट व छोटा हत्तीचा अपघात होवून तिघे जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

(स्विप्ट क्रमांक – एमएच 15 इपी 2441 तर मालवाहतुक गाडी क्रमांक – एमएच 16 -एइ 8305) असुन मालवाहतुक गाडी चालक व स्विप्ट कार चालक जखमी झाले आहे.

त्यांना तत्काळ उपचारासाठी कळवण येथिल रुग्णालयात हलवले आहे. स्विप्ट कारमधील अनिल मोरे, पालवी व घोलप हे कळवण न्यायालयातील कर्मचारी आहे. मालवाहतुक चालक उमेश मोरे रा. डांगसौदांने येथिल आहे.

सामाजिक कार्यकर्ते भुषण देशमुख व त्यांचे सहकार्याने तत्काळ मदत करत जखमींना उपचारासाठी मदत केली. यावेळी कळवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी नांदुरी पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांना तत्काळ याबाबतची माहिती दिली.

पोलिस कर्मचारी योगेश गवळी, शिवाजी शिंदे , अशोक ब्राम्हणे यांनी झालेल्या अपघातातील वाहने बाजूला करुन वाहतुक सुरळीत केली. अधिक तपास पोलिस करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या