Thursday, April 25, 2024
Homeनगरकांदा बियाण्याच्या व्यवहारातून शेतकर्‍यास धमकावले

कांदा बियाण्याच्या व्यवहारातून शेतकर्‍यास धमकावले

पारनेर |तालुका प्रतिनिधी|parner

एक लाख रुपयांच्या चेकपोटी एक लाख रुपये रोख दिलेले असताना वकिलामार्फत नोटीस का पाठविली असा जाब विचारीत

- Advertisement -

दहा लाख रुपयांचा चेक दे नाहीतर तुझ्या बायकोलाच उचलून नेतो, अशी धमकी (साळवाडी ता. जुन्नर) येथील अक्षय सुभाष पटाडे या तरुणाने दिली. यासंदर्भात पाडळीआळे येथील संदीप प्रभाकर डेरे (वय 45, रा. डेरे मळा, पाडळीआळे, ता. पारनेर) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फिर्याद दिली आहे.

जुन्नर तालुक्यातील अक्षय सुभाष पटाडे व किशोर रोहिदास पटाडे (दोघेही रा. पटाडे मळा, साळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी पाडळीआळे ता. पारनेर येथील संदीप प्रभाकर डेरे यांच्याकडून कांद्याचे बियाणे घेतले होते.

त्या बियाण्याच्या व्यवहारावरून त्यांच्यात वाद झाला. बियाण्याच्या रकमेचा एक लाख रुपयांचा चेक न वटल्याने डेरे यांनी पटाडे यांना वकिलामार्फत नोटीस पाठविली होती. नोटीस पाठविल्याच्या रागातून अक्षय पटाडे व किशोर पटाडे हे दि. 15 जानेवारी रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास झेन कार (क्र. एम.एच. 12 ए.एन. 1207) मधून डेरे यांच्या घरी पोहचले.

अनधिकृतपणे घरात घुसून मी तुला एक लाख रुपयांचा चेक दिल्यानंतर एक लाख रूपये रोख देऊनही दादासाहेब चंद्रभान नेमाणे यांनी वकिलामार्फत चेक न वटल्याची नोटीस का पाठविली याचा जाब त्यांनी विचारला. संदीप डेरे यांच्या कानशिलात लगावत शिविगाळ करीत आताच्या आता दहा लाख रुपयांचा चेक दे, अशी धमकी अक्षय पटाडे याने दिली. डेरे यांच्या फिर्यादीवरून अक्षय पटाडे व किशोर पटाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या