Friday, April 26, 2024
Homeनाशिकपुणे विद्यापिठाकडे साडे तीन हजारपेक्षा अधिक तक्रारी

पुणे विद्यापिठाकडे साडे तीन हजारपेक्षा अधिक तक्रारी

नाशिक | Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केलेल्या अंतिम वर्षाच्या निकालाबाबत साडेतीन हजार पेक्षा जास्त तक्रारी आलेल्या आहेत. या तक्रारींचा निपटारा ३ डिसेंबरपर्यंत केला जाणार असल्याचे विद्यापीठाने परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने अंतिम सत्र/अंतिम वर्षाच्या परीक्षा १२ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने घेतल्या. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून तक्रारी येत आहेत. या तक्रारींचे विश्लेषण करुन व तक्रारीसंदर्भात तथ्यता पडताळून सदर तक्रारींचे निवारण करण्यासाठी परीक्षा विभागाने सुरु केलेली आहे.

यामध्ये परीक्षा अर्जातील विषय व विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रत्यक्ष परीक्षा यामध्यो तफावत असणे, दोन वेगवेगळे ई-मेल आयडी देऊन ऑनलाईन परीक्षा देणे, तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन परीक्षांमध्ये व्यत्यय येऊन परीक्षा पूर्ण न होणे, विषयांच्या नामसाधर्म्यामुळे कोड बदलने अशा तक्रारी आलेल्या आहेत.

या सर्व तक्रारी व विद्यार्थ्यांची संख्या यांचा विचार करून विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत अंतिम निर्णय ३ डिसेंबरपर्यंत जाहीर केला जाईल. हा सुधारीत निकाल results.unipune.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे.

परीक्षा अर्ज अर्धवट भरणाऱ्यांना झटका देणार?

विद्यापीठाकडे आलेल्या तक्रारींमध्ये जवळपास १७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज अर्धवट भरला आहे.

त्यामुळे त्याची नोंद निकाल लावताना घेतली गेली नाही. तसेच ३७२ जणांनी दोन ईमेल आयडी दिली आहेत, यामध्ये विद्यार्थ्यांची चूक असल्याने अशांच्या तक्रारींवर नकारात्मक शेरा येण्याची शक्यता आहे. तर विषयांच्या नामसाधर्म्यामुळे ऑनलाइन परीक्षेचा कोड बदलून सुमारे २ हजार ६९५ जणांचा निकाल चुकीचा लागला.

इतर तांत्रिक कारणांमुळे ५३४ विद्यार्थ्यांची काही चूक नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे

या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याबाबत विद्यापीठाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या