Tuesday, April 23, 2024
Homeनगरयंदा कर्जत तालुक्यात होणार १६ हजार रोपांची लागवड

यंदा कर्जत तालुक्यात होणार १६ हजार रोपांची लागवड

कर्जत | प्रतिनिधी

कर्जत तालुक्यात चालू वर्षी १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत १६ हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. शिसम, करंज, बांबू, सीताफळ, आवळा आदी रोपांची रस्ता तसेच कालवा दुतर्फा लागवड केली जाणार आहे.

- Advertisement -

एका किलोमीटर अंतरासाठी ५०० रोपांची लागवड केली जाणार आहे. रोपवाटिकेत ८० हजार रोपे तयार करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल एन. एम. सिंगल यांनी दिली.

तालुक्यातील बिटकेवाडी ते शिंदे (२ किमी.), नांदगाव ते दुरगाव फाटा (२ किमी.), कुळधरण ते राक्षसवाडी फाटा (४ किमी.), राक्षसवाडी ते बेलवंडी (४ किमी.), नलवडे वस्ती ते शेगुड (२ किमी.) या रस्त्यांच्या दुतर्फा लागवड केली जाणार आहे. तसेच महाडिकवाडी ते नांदगाव (४ किमी.) आणि बारडगाव सुद्रिक ते अंबिकानगर (४ किमी.) दरम्यान कालवा दुतर्फा रोपांची लागवड केली जाणार आहे. टाकळी खंडेश्वरी येथे ग्रामपंचायतीच्या ५ हेक्टर क्षेत्रावरही रोपांची लागवड केली जाणार आहे.

सध्या ग्लोबल वार्मिंगची मोठ्या प्रमाणावर समस्या भेडसावत आहे. यासाठी नागरिकांनी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत सहभाग घेवून ती लोकचळवळ करावी. वनमहोत्सव, ग्रामपंचायतीला वाटप व लागवड करून उरलेली रोपे कोरेगाव येथील रोपवाटिकेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

एन. एम. सिंगल, वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण विभाग, कर्जत

- Advertisment -

ताज्या बातम्या