Wednesday, April 24, 2024
Homeजळगावभिंत कोसळून तरुण ठार

भिंत कोसळून तरुण ठार

यावल Yawal (प्रतिनिधी) –

तालुक्यातील कोळन्हावी (Kolanhavi) शेत शिवारात तापी नदीच्या काठी शेतात बांधकाम सुरू होते. दरम्यान अचानक भिंत कोसळली व या दुर्घटनेत यावल शहरातील एक १९ वर्षीय तरूण जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

कोळन्हावी (Kolanhavi) ता. यावल येथील योगेश विठ्ठल सोळुंके यांचे पुनगाव रस्त्यावर तापी नदीच्या काठी शेत आहे. या शेतात बुधवारी यावल येथील गवंडी कामगारांच्या वतीने बांधकाम सुरू होते. बांधकाम करण्यासाठी या ठिकाणी मिक्सर ग्राइंडर (Mixer Grinder)आणले होते.

या मिक्सर ग्राइंडर (Mixer Grinder) वर यावल शहरातील चोपडा रस्त्यावरील डांगपूरा भागातील रहिवाशी शेख दानिश शेख रफिक वय १९ हा तरूण बसला होता. दरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक भिंत मिक्सर ग्राइंडर (Mixer Grinder) वर कोसळली आणी मिक्सर ग्राइंडर (Mixer Grinder) खाली दाबला जाऊन शेख दानिश हा जागीच ठार झाला.

या घटनेमुळे यावल शहर व तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शेख दानिश शेख रफिक हा प्रथमच गवंडी कामासाठी आला होता व अशा दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या