Friday, April 26, 2024
Homeनाशिकभाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

वातावरणातील बदल (Climate change), अवकाळी पाऊस (Untimely rain) यामुळे बळीराजाने (farmer) शेतात पिकवलेल्या भाजीपाला (Vegetables) पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. थोड्याफार शिल्लक राहिलेला भाजीपाला वाचवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. परिणामी मालातील आवक घटली असून मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे भाव (Prices of vegetables) देखील कडाडले आहे.

- Advertisement -

शेतकरी (farmer) वर्गाने मिळेल त्या ठिकाणीहुन कर्ज व भांडवल उपलब्ध करुन राहिलेले भाजीपाला देखील थोड्या फार प्रमाणात वाचवले. त्यामुळे बळीराजाच्या प्रयत्नाला यश आले. आता भाजीपाल्याला चांगला भाव आहे. परंतू वातावरणातील बदलामुळे अतिशय महागडी औषधे दिवसातून तीन वेळा फवारणी करावी लागते. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

सध्या भाजीपाल्याचा भाव गगनाला भिडले असले तरी त्याचा फायदा शेतकर्‍यांना काहीच नाही. कारण उत्पन्न कमी व खर्च जास्त हे समीकरण गुंतागुंतीचे होवून बसले आहे. या महागाईची (Inflation) झळ सर्वसामान्य शेतमजूरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. पुन्हा एकदा करोनाने (corona) आपले डोके वर काढले आहे. त्यामुळे शेतकरी, व्यावसायिक, शेतमजूरांमध्ये चिंतेचे वातावरण सध्या दिसत आहे. भाजीपाल्याचे आवक घटली असून ग्राहक वर्गांकडून मागणी वाढत असल्याने भाजीपाल्याचे भाव प्रचंड प्रमाणात वाढत चालले आहे.

सध्याचे दर (किलो)

टोमॅटो – 40 ते 50 रु., हिरवी मिरची – 80 ते 90, गवार – 100 ते 120, कोंबी – 30 ते 40 रु. (गड्डा), फ्लॉवर – 60 ते 70 रु. (गड्डा), वांगी – 100 ते 120 रु., शेवगा – 70 ते 75 रु., मेथी- 20 ते 25 रु. जुडी, कांदा पात – 30 रु. जुडी, शेपू – 20 रु. जुडी, कोथबिर – 15 ते 20 रु. जुडी, बटाटे – 25 ते 30 रु. कारले – 110 ते 115 रु., कांदा – 45 रु. भेंडी – 80 रु., शिमला मिरची – 80 रु, गिलके – 35, डांगर – 25 ते 30 रु, दोडके – 55 ते 60 रु,

- Advertisment -

ताज्या बातम्या