Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारतळोदा येथील विश्रामगृहातील खानसामा पद रिक्त

तळोदा येथील विश्रामगृहातील खानसामा पद रिक्त

चेतन इंगळे

मोदलपाडा,Modalpada ता.तळोदा –

- Advertisement -

तळोदा (Taloda) येथील शासकीय विश्रामगृहात (government rest house) स्वयंपाक (Cooking) करणार्‍या खानसामाचे (butler) पद गेल्या तीन वर्षांपासून रीक्त (Empty) असल्याने या विश्रामगृहामध्ये येणार्‍या लोकप्रतिनिधी,अधिकार्‍या बरोबरच नागरिकांची गैरसोय (Inconvenience) होत आहे. अशावेळी त्यांना बाहेरून महागडे व बेचव जेवण मागवावे लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने याप्रकरणी दखल घेवून तातडीने येथे खानसामाची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

तळोदा येथील शासकीय विश्रामगृहातील खानसामा गेल्या तीन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाला आहे. परिणामी बाहेरून रेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाला येणार्‍या पाहुण्यांबरोबरच वरिष्ठ अधिकारी, स्थानिक अधिकारी, नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. एवढेच नव्हे तर बाहेरून अतिशय महागडे जेवण मगवावे लागत असते.तेही अक्षरशः बेचव असल्याचे नागरीक सांगतात. वास्तविक तापी नदीवर हातोडा पूल झाल्यामुळे जिल्ह्याचे अंतर निम्याने कमी झाले आहे.

साहजिकच तळोद्यासह धडगाव हे आदिवासी तालुके मुख्यालयाला जोडले गेले आहेत. तसेच उपविभागीय महसूल विभाग तळोद्यातच असल्यामुळे नेहमी वरिष्ठ अधिकार्‍यांचा राबता, बैठका येथेच होत असतात. अशावेळी अधिकारी आराम, भोजन करण्यास विश्रामगृहातच येतात.तथापि त्यांना भोजनाचा प्रश्न पडतो. त्याचबरोबर विश्रामगृहाच्या दुसर्‍या इमारतीची देखील दुरुस्ती व रंगरंगोटी करण्याची आवश्यकता आहे.

कुठे, कुठे भिंतीचे प्लास्टर उखडले आहे. कुशिंग देखील खराब झाले आहे. सबंधित बांधकाम विभागाकडून केवळ चांदसैली व्ही.आय.पी सूट चीच निगा राखली जाते. कारण त्याठिकाणी मंत्री, आमदार, खासदार, प्रमुख वरिष्ठ अधिकारी येतात. म्हणून त्याचा स्वच्छतेकडे अधिक लक्ष घातले जाते. परिसराची देखील स्वच्छता केली जात नाही. येथील कर्मचार्‍यांचा निवासस्थानांचीही दूरवस्था झाली आहे.

शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींव्यतिरीक्त इतर नागरिकांना विश्रामगृहासाठी दर आकारले जातात. यातून बांधकाम विभागाला महसूल मिळत असतो. परंतू या रेस्ट हाऊसला खानसामाच नसल्यामुळे इच्छा असूनही नागरिकांना नाईलाजास्तव टाळावे लागते. मात्र, यामुळे यंत्रणेचा महसूल बुडत आहे.

तळोदा येथील विश्रामगृहातील खानसामाच्या रिक्तपदांचा प्रस्ताव येथील बांधकाम विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. परंतु कार्यवाहीअभावी तो तसाच पडून आहे. यासाठी ही यंत्रणा पाठपुरावाही करीत आहे. मात्र त्यांना कोणीच दाद देत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या