Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाIND VS SL T20 : आज निर्णायक लढत; कोणाचे पारडे जड?

IND VS SL T20 : आज निर्णायक लढत; कोणाचे पारडे जड?

कोलंबो | Colombo

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघांमधील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील (T20 series) तिसरा निर्णयक आणि अंतिम सामना आज गुरुवारी कोलंबोच्या आर प्रेमदासा मैदानावर (R. Premadasa ground) खेळवण्यात येणार आहे…

- Advertisement -

दोन्ही संघांनी मालिकेत १-१ विजय संपादन केल्यामुळे या मालिकेत एक वेगळीच रंगत निर्माण झाली आहे. आज होणारा सामना मालिका विजयासाठी दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे.

भारतीय संघाने पहिला टी २० सामना जिंकून मालिकेत १-० ने विजयी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून आत्मविश्वास उंचावलेला श्रीलंका संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेवर कब्जा करण्यासाठी सज्ज आहे.

तर दुसरीकडे एकदिवसीय मालिकेप्रमाणे (ODI series) टी २० मालिकेत विजय मिळवून दुसरी मालिका खिशात टाकण्यासाठी शिखर धवनची टीम इंडिया दौऱ्याचा शेवट गोड करण्यासाठी सज्ज आहे.

कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह (Krunal Pandya Tested Covid Positive) आल्यामुळे त्याच्या संपर्कातील सर्व आठ खेळाडूंना आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्याजागी भारतीय संघात सलामीवीर ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिकल, नितीश राणा या फलंदाजांना संधी देण्यात आली.

मात्र या संधीचा फायदा त्यांना उठवता आला नाही. आज होणाऱ्या सामन्यात या सर्व खेळाडूंना आपली कामगिरी उंचावण्याची संधी आहे. तसेच भारतीय फलंदाजीतील सध्याच्या संघातील फलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) या दोन प्रमुख खेळाडूंकडून भारतीय संघाला चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

शिवाय ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दुबईत (Dubai) होणाऱ्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेत (T20 World Cup) भारतीय संघात आपली दावेदारी अधिक मजबूत करण्यासाठी शिखर धवन आणि संजू सॅमसन या दोन्ही फलंदाजाना आपली कामगिरी उंचावावी लागणार आहे.

दुसऱ्या टी २० सामन्यात भारतीय संघाला २० षटकात ५ बाद १३२ धावाच काढता आल्या होत्या. मात्र भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, राहुल चाहर यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे श्रीलंकेला अखेरच्या षटकापर्यंत विजयासाठी झुंजवले होते.

आजच्या सामन्यात अशीच कामगिरी भारतीय गोलंदाजांकडून शिखर धवन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना अपेक्षित असेल. यात काही शंका नाही.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या