Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रतिसरी पासून परिक्षा सुरू होणार; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचं सुतोवाच

तिसरी पासून परिक्षा सुरू होणार; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचं सुतोवाच

पुणे | प्रतिनिधि

आठवी पर्यंत परिक्षा घेतल्या जात नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तिर्न करता येत नाही. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. त्या पार्श्वभूमीवर इयत्ता तीसरी पासून पुन्हा परिक्षा सुरू करण्याबाबतचे सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी केले आहे. दरम्यान, परिक्षा घेतली तरी आम्ही मुलांना अनुतिर्ण करणार असा त्याचा अर्थ काढण्यात येऊ नये. हा निर्णय केवळ चर्चेच्या पातळीवर असून या संदर्भात शिक्षण तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच अंतीम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभासाठी केसरकर उपस्थित असताना त्यांनी यासंदर्भात त्यांच्या भाषणात उल्लेख केला. त्यानंतर पत्रकरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. केसरकर म्हणाले, पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. त्यामुळे त्यांच्या परीक्षा गांभीर्याने घेतल्या जात नाहीत म्हणून तिसरीपासून परीक्षा घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांना एटीकेटी सुरु करता येईल का, याबाबत विचारविनिमय सुरु आहे.

शाळा आणि क्रीडा हा विभाग एकत्र असायला हवा. राजकारणातील आघाड्यांमुळे मंत्री वेगवेगळे होतात; पण माझे गिरीश महाजन यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे एकत्र बैठक घेऊन काम करू. क्रीडा आणि शिक्षण खात्याने एकत्र काम केले पाहिजे, मंत्रीही एकच असायला हवा. भविष्यात असा निर्णय झाल्यास ते फायदेशीर ठरेल, असे मतही त्यांनी व्यक्‍त केले.

कौशल्य विकासासाठी आवश्यक सुविधा देणार

येत्या दहा वर्षांत भारत जगातला सर्वांत तरुण देश म्हणून ओळखला जाणार आहे. त्याचे नेतृत्व आजचे विद्यार्थी करणार आहेत. त्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन दीपक केसरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात केले.

केसरकर म्हणाले, “विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठी शारीरिक शिक्षण या विषयासाठी सुरुवातीच्या काळात चार ते पाच शाळांमध्ये किमान एक शिक्षक देणे शासनाच्या विचाराधीन आहे. विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्याबरोबर एकाग्रता साधता यावी यासाठी योगाचे विविध प्रकार शिकविण्याची योजना आहे. तसेच आधुनिक तंत्रशिक्षणाबरोबर संगीत, गायन याचे शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी या क्षेत्रांतील नामवंतांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.”

केसरकर पुढे म्हणाले, “नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी आवश्यक साधने पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत शाळांमध्ये उपलब्ध होतील. इयत्ता तिसरीपासून परीक्षा घेता येईल का? याबाबत तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. गृहपाठ स्वयंस्फूर्तिने करायचा अभ्यास आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठाची किंवा खासगी क्लासची गरज भासू नये असे शिक्षण द्यावे. ई-लर्निंग सुविधा राज्यभर पुरविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी वापरण्यास सुलभ सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. भविष्यकाळात शालेय स्तरावर शिक्षण आणि क्रीडा हे दोन्ही विषय सोबत असतील.”

- Advertisment -

ताज्या बातम्या