Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमनपाचा अतिक्रमण विभाग पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात

मनपाचा अतिक्रमण विभाग पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

नवीन नाशकात मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत पोलांवर लावलेले बॅनर आता खाली पडू लागले आहेत. याकडे नागरिकांचे लक्ष आहे मात्र मनपा प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नवीन नाशिककरांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

नवीन नाशकात विद्रूपीकरण करण्यासाठी होल्डिंग हे मुख्य कारणीभूत ठरत असताना कुठलाही सण किंवा उत्सव असो येथे होल्डिंग लागल्याशिवाय तो सण साजरा केला जात नाही अशी परिस्थिती असताना गेल्या काही महिन्यांपूर्वी रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत पोलांवर बॅनर लावण्यात आले होते.

हवेमुळे हे बॅनर खाली पडले दरम्यान या ठिकाणाहून एक दुचाकीस्वार जात होता मात्र अवघ्या काही अंतरावर हे बॅनर पडल्याने दुचाकीस्वार बचावला मात्र नेहमीच कोणी बचावेल याची काही शाश्‍वती देता येत नसल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.

रविवार दि. 11 रोजी रुंगठा मॉल समोरील मुख्य रस्त्यावरील विद्युत पोल आला लावलेले बॅनर अशाच प्रकारे खाली निसटले सुदैवाने या ठिकाणी काही दुर्घटना घडली नाही.

मात्र रस्त्याच्या कडेला आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी अतिक्रमण करून बसलेल्या भाजी व्यावसायिकांवर तसेच इतर व्यावसायिकांवर कारवाई करत असणारी मनपाची अतिक्रमण यंत्रणा ह्या अनधिकृत होल्डिंग वर कारवाई का करत नाही ? असा प्रश्न आता नवीन नाशिककरांमधून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान अतिक्रमण विभागात सुरू असलेला भ्रष्टाचार गेल्या काही दिवसांपूर्वीच लाचलुचपत खात्याच्या माध्यमातून उघडकीस आला होता. होल्डिंग बाजीवर मनपाच्या अतिक्रमण विभागाचे काही लागेबांधे आहेत का ? असा सवाल आता नवीन नाशिककर उपस्थित करू लागले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या