Friday, April 26, 2024
Homeजळगावउधारी मागणं अंगलट आली, धक्काबुक्की प्राण घेवून गेली

उधारी मागणं अंगलट आली, धक्काबुक्की प्राण घेवून गेली

धरणगाव Dharangaon (प्रतिनिधी)

उधारीने (Borrowing) दिलेले ५० रूपये घेण्याच्या वादातून (argument) पुतण्याने धक्का देवून गटारीत पडलेल्या काकाचा (Uncle) उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाल्याची घटना तालुक्यातील कंडारी (Kandari) येथे घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस (Dharangaon Police) ठाण्यात पुतण्याविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

भारत सुकडू भिल (Bharat Sukadu Bhil) (वय ४४) असे मयताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील कंडारी येथे राजू मानसिंग भिल (Raju Mansingh Bhil) (वय २८) आणि भारत सुकडू भिल (वय ४४) या दोघांमध्ये ५० रुपयांच्या उधारीवरून सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शाब्दिक चकमक सुरू झाली. थोड्याच वेळात शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत (Fighting) झाले. या हाणामारीत राजुने आपले काका भारत यांना जोराचा धक्का दिला. यात भरत भील हे बाजूला असलेल्या गटारीत जाऊन पडले. गटारीत पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार (Strike hard) बसून मोठा रक्तस्त्राव झाला.

यानंतर भेदरलेल्या पुतण्या राजूने त्यांना लागलीच नातेवाईकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (medical authorities) तपासणीअंती भारत भिल यांना मृत (Dead) घोषित केले. यासंदर्भात पुतण्या राजू भिल याच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या