भीषण अपघात! ट्रक आणि बसमध्ये धडक, ७ जणांचा मृत्यू

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील (Ayodhya Accident) लखनौ-गोरखपूर महामार्गावर खासगी बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. यात ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला (Truck Bus collide) धडक बसल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

या अपघातात सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून ४० जण गंभीर जखमी झाली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. या घटनेनंतर जखमींना तत्काळ जवळच्या सरकारी रुग्णालायात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटना लखनऊ-गोरखपूर महामार्गावर (Lucknow-Gorakhpur Highway) झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. तर घटनेनंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील जखमींना वाचवण्याचे काम सुरू केले.

नाशिक कृउबा निवडणूक : आमदाराला धमकी; चुंभळे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अयोध्येकडून येणाऱ्या खासगी बसने आंबेडकरनगरकडे जाण्यासाठी लखनौ-गोरखपूर महामार्गवरून वळण घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील काही प्रवाशी बाहेर फेकले गेले, तर काही जण ट्रकखाली दाबले गेले.

खरेदीचा ‘अक्षय्य’ मुहूर्त

सदर अपघातानंतर या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता. या अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले. अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आलेली आहे.

एसटीला आर्थिक चणचण

दरम्यान, या अपघातानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ट्वीट करत दु:ख व्यक्त केले. अयोध्येतील अपघाताचे वृत्त ऐकून मन दु:खी झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *