Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकबँक्वेट हॉलचे रुपांतर झाले रुग्णालयात; 10 हजार रुग्णांनी घेतले मोफत उपचार

बँक्वेट हॉलचे रुपांतर झाले रुग्णालयात; 10 हजार रुग्णांनी घेतले मोफत उपचार

नाशिक | प्रतिनिधी

करोना काळात रुग्णांना पैसे देऊनही बेड उपलब्ध होत नव्हते, तर शासकीय रुग्णालयदेखील हाउसफुल्ल होते. अशा वातावरणात अशोका मार्ग परिसरातील वातानुकूलित बगई बँकेट हॉलचे रूपांतर रुग्णालयात करून युसुफिया फाऊंडेशनने या ठिकाणी गरजू व गरीब रुग्णांसाठी तसेच सर्वांसाठी मोफत रुग्णालय सुरू केले…

- Advertisement -

फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी मुजाहिद शेख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. याठिकाणी 20 बेड ची व्यवस्था करण्यात आली होती तर मुबलक प्रमाणात औषध साठा देखील उपलब्ध करण्यात आला होता.

अशोका मेडिकल हॉस्पिटलचे डॉ. वाघ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दिवसभर चालणाऱ्या या रूग्णालयात नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्याचे रुग्ण तसेच इगतपुरी, भिवंडी, मालेगाव येथून ही रुग्णांनी घेऊन या रुग्णालयातून लाभ घेतला.

या ठिकाणी सर्व प्रकारची औषधे, इंजेक्शनसह सलाईन देखील मोफत देण्यात आली. येणाऱ्या प्रत्येकाची नोंद करून त्यांना उपचार झाल्याची पावती देखील या ठिकाणी मिळत आहे. यामुळे पुढच्या वेळेला येताना त्यांना तीच पावती उपयोगी पडत आहे, मोफत रुग्णालय सुरू करूनही अत्यंत चोख नियोजन व शिस्तबद्ध पद्धतीने त्याची अंमलबजावणी होत असल्यामुळे रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा याठिकाणी मिळाल्याने समाधान आहे.

याठिकाणी डॉ. दिनेश वाघ, डॉ. ओमिस अहमद, डॉ. खलील अन्सारी, डॉ. शिरीन शेख आदी तज्ञ मंडळी उपचार करीत आहेत.

नाशिककरांना मोफत चांगली आरोग्य सेवा सुविधा मिळावी, या उद्देशाने युसुफिया फाउंडेशनच्या वतीने मोफत रुग्णालय सुरू करण्यात आले होते. सुरवातीला सलाईन, इंजेक्शन व इतर सर्व औषधे गोळ्या मोफत देण्यात आले तर ऍडमिट करण्याची सोय देखील 20 बेड लावून करण्यात आली होती. आता आपण जर्मनीहून थेट ऑक्सीजन मशीन मागवले असून मंगळवार दिनांक 18 मे पासून मोफत ऑक्सिजनसह रुग्णालय रुग्णांच्या सेवेत सुरू राहणार आहे. जोपर्यंत रुग्ण संख्या अगदी कमी होऊन बंद होत नाही तोपर्यंत मोफत शिबीर सुरूच राहणार आहे. सर्व समाजातील लोकांनी याचा लाभ घ्यावा.

इस्माईल मुजाहिद शेख (संचालक)

- Advertisment -

ताज्या बातम्या