Friday, April 26, 2024
Homeनगरकेडगावसाठी हवेत दहा कोटी

केडगावसाठी हवेत दहा कोटी

अहमदनगर (प्रतिनिधी) –

केडगावचा विस्तार वाढत असल्याने विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी दहा कोटी रूपयांचा विशेष निधी द्यावा अशी

- Advertisement -

मागणी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केली आहे. केडगाव परिसरातील रस्ते, लाईट, ड्रेनेज, उद्यानं सुशोभिकरणासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.

त्यासाठी आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी केडगावच्या विकासासाठी जिल्हा नियोजन किंवा शासनाकडून 10 कोटीचा निधी उपलब्ध करून दयावा अशी मागणी कोतकर यांनी केली. केडगाव अरणगांव (मेहेरबाबा मार्ग) रस्त्याचे अत्यंत दुर्दशा झाली आहे. हा रस्ता

जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्याने मनपाकडून या रस्त्याच्या विकासकामासाठी निधी उपलब्ध होत नाही. जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे वेळोवेळी पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला आहे. परंतु निधी उपलब्ध नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. नगर दौण्ड महामार्गाचे काम सुरू असताना या मार्गावरील वाहतून केडगांव, अरणगांव (मेहेरबाबा) रस्त्यावरून वळविण्यात आली होती. या रस्त्यावरून

अवजड वाहतुक मोठया प्रमाणात झाल्यामुळे मोठ मोठे खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या भागातील नागरिकांचा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणे येणे अवघड झाले आहे. व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी या रस्त्याच्या कामासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दयावा अशी मागणी कोतकर यांनी आ.जगताप यांच्याकडे केली.

निधीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा : आ. जगताप

अरणगाव रस्त्याच्या कामाची पाहणी करून लवकरच शासनाकडून निधी उपलब्ध करून देवू तसेच केडगांवच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासन पातळीवर प्रयत्न केले जातील. रस्त्याच्या कामासाठी निधी मिळविण्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन आ. जगताप यांनी कोतकर यांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या