Friday, April 26, 2024
Homeनगरकाही एकर जमिनी असूनही अनेक देवस्थानांची अवस्था दैनिय

काही एकर जमिनी असूनही अनेक देवस्थानांची अवस्था दैनिय

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील देवाची पूजा व्यवस्था उत्तम चालली असली तरी बहुतांश ठिकाणी देवस्थानांची, मंदिरांची अवस्था दिनवाणी झाली असल्याचे वास्तव समोर आले आहे. अनेक ठिकाणी ज्या पुजार्‍याच्या नावावर देवाचे इनाम आहे. नित्य पूजेचा मानकरी देवाचे मूळ पुजारी, विश्वस्त असलेले अनेक जण आता त्या त्या गावात राहतच नसून नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर स्थायिक झाले असून गावकर्‍यांनी अनके ठिकाणी पुढे येत गावचे ग्रामदैवताची व्यवस्था उभारली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील शंभरच्या आसपास ग्रामदैवत आणि संत महात्मे यांच्या पूजाविधी, नित्यसेवा देवस्थान व्यवस्था यासाठी मागील, पाचशे वर्षांपासून दिलेली देवस्थान जमीन बाबत, मोक्याच्या जागाबाबत होत असलेली चुकीच्या बाबी दैनिक सार्वमत मधून प्रसिद्ध झाले नंतर ज्या देवस्थान इनाम जमिनी बाबतीत सुरू असलेली गैरप्रकार तसेच याबाबत यापूर्वी घडलेले चुकीचे व्यवहार बाबतीत अनेक गावातील ग्रामस्थ आपल्या देवाची कथा आणि देवाच्या जमिनीची व्यथा सार्वमतशी व्यक्त करत आहेत.

अनके ठिकाणी देवाच्या जमिनी देवाच्या नावाने आहेत मात्र जमिनीची ताबे हे देवस्थान कमिटी कडे नाहीत. पूर्वी ज्याला देवासाठी ठराविक रक्कम, ठरवून जमीन कसायला दिली ते आता देवाला एक दिवा ही लावायला तयार नाहीत. काही ठिकाणी जमीन देवस्थानची आहे परंतु ताबा दुसर्‍या कुणाचा तरी आहे. ज्यांनी देवाचा जमीन ताबा घेतला ते आता जमीन सोडायला तयार नाहीत असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जमीन देवाची येणारे उत्पादन मात्र स्वाताच्या पोटासाठी खर्च करणारे अनेक जण आहेत. अनेक ठिकाणी देवाचे मूळ पुजारी आता गावात राहत नाहीत. त्यानी दुसरे पुजारी नेमले आहेत. अनके देवालय केवळ नावाला पुजार्‍याचा ताब्यात राहिले आहेत.

काही देवाची पूजाअर्चना गावकर्‍यांनी हातात घेलती आहे. ग्रामदैवताची व्यवस्था ग्रामस्थ मोठ्या भक्ती भावाने करत आहेत. तर काही देवालयाची अवस्था ही दययनीय बनली आहे. काही गावात देवाच्या मोक्याच्या जागेत अतिक्रमण केली आहेत ते काढायला तयार नाहीत।अनेक ठिकाणी विश्वस्त मयत होऊन पन्नास साठ वर्ष झाली आहेत. त्याबाबत काहीही निर्णय झालेले नाहीत.

शहरातील एका मंदिरातील देव उघड्यावर

एक देवस्थान वर असलेले संत महात्म्यची पूजा अर्चा रोज करण्यासाठी पुजारी नेमला आहे. चारशे वर्ष जिथं अखंड हरिनामाचा गजर होत होता तिथली अवस्था आता दययनीय झाली आहे. मंदिराचा सभामंडप मागेच मोडकळीस आला होता. आता इथली विठ्ठल रुखमाई च्या वरचे छत ही राहिले नसून ऊन, वारा, कधी पाऊस सहन करण्याची वेळ देवावर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या