Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यानिफाड @८.५ अंश सेल्सियस; नाशिकमध्येही पारा १०.४ अंशांवर

निफाड @८.५ अंश सेल्सियस; नाशिकमध्येही पारा १०.४ अंशांवर

नाशिक/निफाड | प्रतिनिधी

गुलाबी थंडीची चाहूल यंदा नाशिककरांना नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच लागली आहे. त्यामुळे यंदा हिवाळा लवकर आल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये दिसून येते. आज निफाडच्या गहू संशोधन केंद्रात 8,5 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली तर नाशिक शहराचा परदेखील घसरला असून १०.४ अंश सेल्सियसवर स्थिरावला आहे…

- Advertisement -

दवबिंदू गोठेपर्यंत निफाडमध्ये तपमान खाली कोसळते. आज अचानक पारा दहा अंशांच्या खाली आल्यामुळे या हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली.

अचानक थंडी वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत अडकले आहेत. तर गहू, हरभरा कांदा पिकासाठी थंड वातावरण लाभदायक असून पावसाळी कांद्याची जमिनीत वाढ चांगल्या प्रकारे होईल असे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत.

नाशिकसह जिल्ह्यात वाढलेल्या थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. रस्त्यांसह वाडी वस्त्यांवर शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

नोव्हेबर महिन्याची सुरुवात होताच नाशिकमध्ये किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. आज पारा १०.४ अंशांपर्यंत येऊन पोहोचला. याच थंडीचा आनंद लूटण्यासाठी नाशिककर जॉगिंग ट्रेकवर दाखल झालेले दिसून येतात.

लॉकडाऊनमध्ये सूने पडलेले रस्ते पुन्हा एकदा फुलू लागले आहेत. व्यायामाला हिवाळ्यापासून सुरुवात करणारी हौशी मंडळीदेखील सध्या रस्त्यावर दिसू लागली आहे. रात्रीच्या वेळी शहरासह ग्रामीण भागातील रस्ते वाढलेल्या थंडीने ओस पडलेले दिसून येतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या