Friday, April 26, 2024
Homeनाशिकविद्यार्थ्यांसमोर तांत्रिक आव्हाने: डॉ. पवार

विद्यार्थ्यांसमोर तांत्रिक आव्हाने: डॉ. पवार

ओझर । वार्ताहर | Ozar

आधुनिक काळात प्रत्येक क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानामुळे (Technology) नवनवीन आव्हाने निर्माण होत असून, शिक्षण क्षेत्रसुद्धा (Education sector) त्यास अपवाद नाही.

- Advertisement -

अशा नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक युगातील विद्यार्थ्यांनी (students) सज्ज व्हावे, त्यासाठीच कष्ट आणि अभ्यास यास पर्याय नाही, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी केले.

केंद्र शासनाच्या (central government) परीक्षा पे चर्चा या उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशातील सर्व विद्यार्थ्यांना (students) संबोधित केले. त्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ओझर महाविद्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. पवार बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा (exams) व शिक्षणासंदर्भातील विविध प्रश्नांना आपल्या विशिष्ट शैलीने उत्तरे दिली. त्यानंतर डॉ. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा मोठ्या आहेत.

त्यासाठी विद्यार्थ्यांनी सूक्ष्म नियोजन (Micro planning) आणि अभ्यास केल्यास कोणत्याही क्षेत्रात सहज यश मिळते, हे विविध उदाहरणांनी पटवून दिले. प्राचार्य डॉ.आर.डी. दरेकर यांनी प्रास्ताविक करताना डॉ. पवार यांचे स्वागत करून महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. व्यासपीठावर सहकार नेते भागवत बोरस्ते, युवा नेते यतीन कदम, किशोर कदम, डॉ.तानाजी वाघ, भास्कर शिंदे, व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.

भागवत बोरस्ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचा हा उपक्रम स्तुत्य असून, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. रसिका हंडोरे हिने परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचा नक्कीच लाभ होईल, असे सांगितले. यावेळी मविप्र संस्थेच्या विविध शाखांवर नव्याने नियुक्त झालेल्या स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्यांचा सत्कार डॉ.भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

सत्कार कार्यक्रमाचे आयोजन यतीन कदम यांनी केले होते. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रीतीने संचलन करीत मान्यवरांचे स्वागत केले. डॉ.नारायण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ.पी.आर. भदाणे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या