Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनतुम्ही पाहिलाय का 'द काश्मीर फाईल्स'चा टिझर?

तुम्ही पाहिलाय का ‘द काश्मीर फाईल्स’चा टिझर?

मुंबई | Mumbai

‘द काश्मीर फाईल्स’ (the kashmir files) या ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या आगामी चित्रपटाच्या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे…

- Advertisement -

‘कू’ ॲपवर (Koo App) नुकताच चित्रपटाचा टीझर प्रक्षेपित करण्यात आला आहे. आपले घरदार सोडून काश्मीरमधून जीव मुठीत धरून पलायन केलेल्या काश्मीरी पंडितांना अजूनही तिथे परत जाता आलेले नाही. या मागच्या कथेचे वर्णन या चित्रपटात करण्यात आले आहे.

अनुपम खेर यांनी “द काश्मीर फाईल’ हा चित्रपट त्यांचे वडील पुष्करनाथ यांना अर्पण केला आहे. माझ्याकरीता हा केवळ चित्रपटच नाही. तर गेल्या ३० वर्षांपासून जगापासून लपवून ठेवले आहे. पण, आता हे सत्य जगासमोर येणार आहे, असे अनुपम खेर यांनी कू अॅपवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

या चित्रपटात जम्मू काश्मीरचे निवृत्त विभागीय आयुक्त ब्रम्ह भट्ट यांची भूमिका मिथुन चक्रवर्ती यांनी केली आहे. तर प्रोफेसर राधिका मेनन यांची भूमिका पल्लवी जोशी यांनी केली आहे. येत्या २६ जानेवारी २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे लेखन विवेक अग्निहोत्री आणि सौरभ एम. पांडे यांचे असून दिग्दर्शन विवेक अग्निहोत्रीचे आहे. याशिवाय चित्रपटात चिन्मय मंडलेकर, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, प्रकाश बेलवाडी आदींनी भूमिका साकारल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या