टीम इंडियाला मालिका विजयाची संधी

jalgaon-digital
2 Min Read

कोलंबो | Colombo

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात सलामी सामन्यात श्रीलंकेला (Srilanka) ७ विकेट्सने पराभूत करून प्रचंड फॉर्मात असलेली टीम इंडिया (Team India) आज मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये निर्णायक सामना खेळणार आहे.

या सामन्यात विजय संपादन करून मालिका खिशात टाकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध मालिका विजय (Series Win) संपादन केल्यास भारतीय संघाला सलग नववी मालिका श्रीलंकेविरुद्ध जिंकण्यात यश संपादन करता येईल.

याशिवाय श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक विजय संपादन करणारा संघ बनण्याची कामगिरी टीम इंडियाला करता येईल. तर दसून शनाकाच्या नेतृत्वाखालील युवा श्रीलंका संघाला सलामी सामन्यातील (Second Match) पराभव विसरून भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी नव्या योजनांसह मैदानात उतरावे लागणार आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने अपेक्षेनुसार कामगिरी केली. पृथ्वी शॉ (Pruthvi Shaw) आणि ईशान किशन (Ishan Kisan) यांनी आपल्या आक्रमक खेळाच्या बळावर यजमान श्रीलंकेला सुरुवातीपासूनच दडपणात ठेवलं. तर कर्णधार म्हणून आपला पहिला सामना खेळणाऱ्या शिखर धवन याने एक बाजू लावून धरत यजमान संघावर आपल्या संयमी खेळीच्या जोरावर श्रीलंकेला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी हिरकावून घेतली.

पहिल्या सामन्यातील विजयी लय कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ आपल्या अंतिम ११ चमूमध्ये बदल करण्याची शक्यता कमी दिसत आहे. या सामन्यात विजय मिळवून अंतिम सामन्यात संघातील इतर राखीव खेळाडूंना संधी देण्याची रणनीती राहुल द्रविड अँड कंपनीची असेल. यात काही शंका नाही.

दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांची नजर पृथ्वी शॉच्या खेळावर टिकून असेल. पहिल्या सामन्यात २४ चेंडूंमध्ये ४३ धावांच्या खेळीनंतरही त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यामुळे आज मंगळवारी होणाऱ्या सामन्यात मोठी खेळी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. यात काही शंका नाही.

– सलिल परांजपे, नाशिक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *