Wednesday, April 24, 2024
Homeनगरशिक्षक पुरस्काराला 17 सप्टेंबरचा मुहूर्त

शिक्षक पुरस्काराला 17 सप्टेंबरचा मुहूर्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील दोन वर्षांचे व यंदाचे असे एकत्रित तीनही वर्षांचे शिक्षक पुरस्कार वितरण करण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या 17 सप्टेंबर रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मागील दोन वर्षे करोनामुळे कार्यक्रम घेता न आल्याने या पुरस्कारांचे जाहीर वितरण झाले नव्हते. दरम्यान कार्यक्रमाचे ठिकाण ठरवण्याचे बाकी असून शहर परिसरात येत्या दोन दिवसांत ठिकाणही ठरवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणार्‍या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी शिक्षकदिनी (5 सप्टेंबर) जिल्हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. शिक्षकदिनीच या पुरस्काराचे वितरण करण्याची परंपरा आहे. परंतु मागील दोन वर्षे करोनामुळे कार्यक्रम घेता न आल्याने या पुरस्कारांचे जाहीर वितरण झाले नव्हते. त्या दोन्ही वर्षी केवळ पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदा करोनाचा प्रादुर्भाव नसल्याने जाहीर कार्यक्रम घेऊन शिक्षकांना सन्मानित करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले होते.

परंतु यंदाही शिक्षकदिनी त्याला मुहूर्त लागला नाही. शिक्षकदिनी केवळ पुरस्कार जाहीर करण्यात आले. आता कार्यक्रमाच्या खर्चाची तरतूद झाल्याने, तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांची वेळ मिळाल्याने 17 सप्टेंबर ही तारीख अंतिम करण्यात आली आहे. केवळ ठिकाण ठरवण्याचे बाकी असून शहर परिसरात येत्या दोन दिवसांत ठिकाणही ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे तीनही वर्षांचे शिक्षक व केंद्रप्रमुख असे एकूण 46 पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या