Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयतनपुरे-पाटील यांचे वांबोरीत अर्धातास ‘गुफ्तगू’

तनपुरे-पाटील यांचे वांबोरीत अर्धातास ‘गुफ्तगू’

उंबरे |वार्ताहर| Umbare

माजी खासदार प्रसाद तनपुरे व डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील यांची वांबोरी ग्रामपंचायतीमध्ये अर्धातास चर्चा झाली.

- Advertisement -

या भेटीत काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात असले तरी ही भेट वांबोरीत चर्चेचा विषय ठरली आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांचे चक्क वांबोरीत ‘गुफ्तगू’ झाल्याने राहुरी तालुक्यातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. तनपुरे व पाटील हे तालुक्याच्या स्थानिक राजकारणातील पारंपरिक विरोधक असल्याने त्यांच्या गोपनीय चर्चेला महत्त्व आले आहे.

वांबोरी ग्रामपंचायतीमध्ये काल गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान उदयसिंह पाटील हे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये होते. त्यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे हे त्याठिकाणी आले. त्यांची अर्धातास चर्चा झाली. त्यांची चर्चा सुरू असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे हे त्या ठिकाणी येताच त्यांनी चर्चा बंद करून त्या ठिकाणाहून भिटे यांच्यासोबत ते निघून गेले.

विशेष म्हणजे वांबोरी ग्रामपंचायत निवडणूक होऊ घातल्याने तनपुरे-पाटील यांच्यात निवडणुकीची चर्चा झाली की काय? यामुळे तनपुरे गटाच्या कार्यकत्यार्ंमध्ये पुन्हा एकदा वांबोरीमध्ये तनपुरे-पाटील युती होते की काय? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

इकडे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी ससभापती अ‍ॅड. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती सदस्य उदयसिंह पाटील, भानुदास कुसमुडे, कृष्णा पटारे, आबा पाटील, श्यामराव पटारे, आदी कार्यकर्ते निवडणुकीची मोर्चेबांधणी करीत आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, किसनराव जवरे, नितीन बाफना यांची निवडणुकीची तयारी सुरू आहे.

अशातच काल माजी खासदार प्रसाद तनपुरे व उदयसिंह पाटील यांच्यामध्ये अर्धातास चर्चा झाल्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी ? व त्यांची नेमकी काय चर्चा झाली? हे गुलदस्त्यातच राहिले असून तो एक चर्चेचा विषय बनला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या