कसारा घाटात टँकरचा अपघात; चालक गंभीर

jalgaon-digital
1 Min Read

इगतपुरी | Igatpuri

नाशिक मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असलेला खाद्य तेलाचा टँकर (Edible Oil Tanker) कसारा घाटात (Kasara Ghat) अपघात घडल्याची घटना घडली आहे. कसारा घाटातील ब्रेक फेल पॉइंट जवळ उतरावर उलटल्याची घटना घडली होती. सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली…

नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणारा टँकर क्रमांक जीजे १२ बीडब्ल्यू ८८१८ चे ब्रेक अचानक फेल झाल्याने टँकर चालकाचा टँकर वरील ताबा सुटल्याने हा टँकर रस्त्याच्या बाजूला उलटला.

सीबीआयच्या छापेमारीवर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया; म्हणाले, देशभक्त असण्याची…

दरम्यान, रूट पेट्रोलिंग टीम आणि महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघात होताच टँकरमधून तेल गळती चालू झाली होती, मात्र पोलिसांनी ही तेल गळती रोखून सांडलेल्या तेलावर माती टाकल्यामुळे पुढील दुर्घटना टळली.

WTC Final 2023 : क्रिकेटमधील ‘हा’ वादग्रस्त नियम ICCकडून रद्द, सूर्या-विराटने सोसलेले नुकसान

दरम्यान, पोलिसांच्या तत्परतेमुळे मुंबईला जाणाऱ्या वाहनांचे अपघात टळले व वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी कसारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *