Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशकोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, ‘तांडव’ने मागितली माफी

कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, ‘तांडव’ने मागितली माफी

नवी दिल्ली –

हिंदू देवतांवर आधारित वादग्रस्त दृश्यांमुळे पॉलिटिकल ड्रामावर आधारित ‘तांडव’ या वेब सीरिजवरुन नवा वाद निर्माण झाला

- Advertisement -

आहे. या वेबसिरीजमधून हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्विट करत माफी मागितली आहे.

अली अब्बास जफर हे ट्विट करत म्हणाले आहेत की, तांडव वेब सीरिजच्या संपूर्ण टीमचा आणि क्रू मेंबर्सचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. जर कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी मागतो, असे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा, सूनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका असलेली निर्माता अली अब्बास जफर याची ‘तांडव’ ही वेब सीरिज 15 जानेवारीला प्रदर्शित झाली असून वादात सापडल्याचं पहायला मिळतंय. या वेबसिरीजमध्ये सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे. तांडव ही वेबसिरीज अ‍ॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली आहे.

अनेकांनी या वेबसिरीजवर हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. या सिरीजमधल्या एका सीनमध्ये अभिनेता मोहम्मद जीशान अयूब हा भगवान शंकराच्या वेषात दिसत आहे. त्या सिनमध्ये भगवान श्री राम व शिव शंकरावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. या गोष्टीवरुन चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेषत: हिंदू संघटना या वेबसिरीजवर भडकल्या असून तांडवच्या मेकर्सनी माफी मागावी असे सांगितले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या