Saturday, April 27, 2024
Homeनगरतळेगाव ग्रामपंचायत निवडणूक थोरात-विखे गटात सत्तासंघर्ष

तळेगाव ग्रामपंचायत निवडणूक थोरात-विखे गटात सत्तासंघर्ष

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या आणि संवेदनशील समजल्या जाणार्‍या तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आजी-माजी महसूल मंत्र्यांचे गट एकमेकांच्या विरुद्ध मैदानात उतरले असून वंचितचा उमेदवार सरपंच पदासाठी या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बिरोबा महाराज शेतकरी विकास मंडळा विरुद्ध महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाच्या बिरोबा महाराज जनसेवा ग्रामविकास मंडळात लढत होत आहे.

- Advertisement -

तळेगाव दिघे ग्रामपंचायतची निवडणूक थोरात – विखे गटांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. लोकनियुक्त सरपंचपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. ओबीसी महिला राखीव सरपंच पदासाठी थोरात गटाकडून बिरोबा महाराज शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवार सौ. राजश्री बाबासाहेब कांदळकर विरुद्ध विखे गटाकडून श्री बिरोबा महाराज जनसेवा ग्राम विकास मंडळाच्या उमेदवार सौ. उषा रमेश दिघे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सौ. शीला तात्यासाहेब दिघे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कांदळकर, सरपंच बाबासाहेब कांदळकर, सोसायटीचे अध्यक्ष केरु पाटील दिघे, संगमनेर शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे, सोसायटीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब पुंजा दिघे, उपसरपंच रमेश सावित्रा दिघे, नजीर शेख, रावसाहेब जगताप, माजी उपसरपंच बाळासाहेब दिघे यांच्या नेतृत्वाखालील बिरोबा महाराज शेतकरी विकास मंडळाचे प्रभाग क्रमांक 1 मधून सर्वसाधारण मतदार संघातून जालिंदर नवनाथ दिघे, ओबीसी स्री राखीव मतदार संघातून शोभा मनोहर कांदळकर, सर्वसाधारण स्री राखीव मतदार संघातून गीता प्रदीप दिघे. प्रभाग क्रमांक 2 मधून नागरिकांच्या ओबीसी मतदार संघातून रमेश दगू दिघे, अनुसूचित जाती स्री मतदार संघातून आशा सुरज इल्हे, सर्वसाधारण स्री मतदार संघातून वैशाली राजेश दिघे.

प्रभाग क्रमांक 3 मधून ओबीसी पुरुष मतदार संघातून संजय त्र्यंबक जोर्वेकर, सर्वसाधारण मतदार संघातून लक्ष्मण ज्ञानदेव भागवत, सर्वसाधारण स्री राखीव मतदार संघातून ज्योती गोकुळ दिघे. प्रभाग क्रमांक 4 मधून सर्वसाधारण मतदारसंघातून चांगदेव बाळू दिघे, ओबीसी स्री राखीव मतदार संघातून रोहिणी संपत दिघे, सर्वसाधारण स्त्री राखीव मतदारसंघातून तेरीजा दिनकर जगताप. प्रभाग क्रमांक 5 मधून अनुसूचित जाती मतदार संघातून धनंजय जनार्दन इल्हे, सर्वसाधारण मतदार संघातून भाऊसाहेब बाळासाहेब दिघे, सर्वसाधारण स्त्री राखीव मतदार संघातून कुसुम प्रकाश दिघे निवडणूक रिंगणात आहेत.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती नामदेव दादा दिघे, पुंजा आनंदा दिघे, बापूसाहेब नरहरी दिघे, रमेश कान्होबा दिघे, रामदास कारभारी दिघे, अण्णासाहेब सोपान दिघे, विकास गुरव, दत्तात्रय ज्ञानेश्वर दिघे, दीपक संपत दिघे, गोविंद कांदळकर, दत्ता जोर्वेकर, नवनाथ लक्ष्मण दिघे यांच्या नेतृत्वाखाली श्री बिरोबा महाराज जनसेवा ग्रामविकास मंडळाचे प्रभाग क्रमांक 1 मधून सर्वसाधारण व्यक्ती मतदार संघातून मच्छिंद्र बाबुराव खोकराळे, सर्वसाधारण स्री मतदार संघातून कुसुम बबन दिघे, ओबीसी स्री मतदार संघातून सुमन रावजी कांदळकर. प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण व्यक्ती मतदार संघातून बाळू साहेबराव दिघे, सर्वसाधारण स्री मतदार संघातून दीपाली मीननाथ दिघे, अनुसूचित जाती स्री मतदार संघातून मंदाबाई रघुनाथ इल्हे.

प्रभाग क्रमांक 3 मधून सर्वसाधारण व्यक्ती मतदार संघातून आबासाहेब तात्यासाहेब भागवत, ओबीसी प्रवर्ग पुरुष मतदार संघातून अतुल दामू कदम, सर्वसाधारण स्री मतदार संघातून कोमल राहुल जगताप, प्रभाग क्रमांक 4 मधून सर्वसाधारण व्यक्ती मतदार संघातून मयूर नवनाथ दिघे, ओबीसी स्री मतदार संघातून दुर्गा राजेश दिघे, सर्वसाधारण स्री मतदार संघातून सुरेखा सुभाष जगताप. प्रभाग क्रमांक 5 मधून सर्वसाधारण मतदार संघातून शिवाजी कचरू दिघे, सर्वसाधारण स्री मतदार संघातून सविता दत्तात्रय दिघे, अनुसूचित जाती मतदार संघातून शशिकांत बाळासाहेब जगताप निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधून आत्माराम संतूजी जगताप व प्रभाग क्रमांक 5 मधून गोरक्षनाथ सूर्यभान दिघे हे स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तळेगाव दिघे ग्रामपंचायतची निवडणूक जिंकण्यासाठी विखे – थोरात गटांकडून साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर सुरू झाला असून निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. दोन्ही गटांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली असून सरपंच पदासाठी वंचितचा उमेदवार आपली ताकद आजमावत आहे. तळेगाव दिघे ग्रामपंचायतच्या राजकारणात प्रथमच थोरात – विखे गटांमध्ये लढत होत असून सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. निवडणूक प्रचारात दोन्ही गटांकडून सर्रास आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. दि. 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत मतदार कुणाला कौल देतात ? हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या