Thursday, April 25, 2024
Homeजळगावलाच प्रकरणातून तलाठी निर्दोष मुक्त

लाच प्रकरणातून तलाठी निर्दोष मुक्त

पारोळा – parola

सात बारा उताऱ्यावर कर्जाच्या बोझ्याची नोंद करण्या साठी हिरापुर येथील तलाठी राकेश भगवान काळमेख यांनी एक हजार रुपयाची लाच मागितली म्हणून अँटी करप्शन ब्यूरो नाशिक येथे दि.19 जून 2015 रोजी तक्रारदार शांताराम नामदेव पाटील यांनी तक्रार दिली होती. नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने तलाठी काळमेख यांना एक हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते.

- Advertisement -

पोलिस निरीक्षक माधवी चौधरी यांचे फिर्यादी वरून तलाठी काळमेख यांचे विरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला भाग 6 गु. र. न.3062/2015 लाच.लूचपत.प्रतिबंध कायदा कलम 7,13(1)(ड) ,13(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन तलाठी काळमेख यांचे विरुद्ध अमळनेर सत्र न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. अमळनेर सत्र न्यायालयाचे न्यायधीश पी. आर. चौधरी यांचे पुढे सदर खटल्याचे काम चालले.

आरोपी तर्फे पारोळा येथील विधितज्ञ ॲड.उज्वल बी.मिसर व ॲड.सिध्दांत मिसर् यांनी कामकाज बघितले. सरकार पक्षातर्फे एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. चौकशी अंती आरोपी राकेश भगवान काळमेख यांचे विरूद्ध गुन्हा सिध्द होऊ न शकल्याने त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या