Friday, April 26, 2024
HomeनाशिकNashik Crime : दोन हजारांची लाच घेताना तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

Nashik Crime : दोन हजारांची लाच घेताना तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

जमीन (Land) खरेदी केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच (Bribe) मागितल्याप्रकरणी त्र्यंबकेश्‍वर येथील तलाठी व कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ अटक केली आहे…

- Advertisement -

सिन्नर : गुळवंचमधील संशयिताची आत्महत्या

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराने (Complainant) एक जमीन खरेदी केली होती. त्यावेळी जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करून दिल्याच्या मोबदल्यात संतोष शशिकांत जोशी (तलाठी) (वय-४७, रा. त्र्यंबकेश्वर) आणि रतन सोनाजी भालेराव (कोतवाल) (वय-५१) यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

राष्ट्रवादीला सोबत घेताना आम्हाला विश्वासात घेतले नाही; ‘या’ आमदाराने बोलून दाखवली खदखद

त्यानंतर याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता एसीबीच्या पथकाने पडताळणी केल्यावर बुधवार (ता.५) रोजी त्र्यंबकेश्वर तलाठी कार्यालयात (Talathi Office) सापळा रचत लाचखोर जोशी यांना पंचासमक्ष दोन हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

NCP Crisis : शरद पवारांचे अजित पवार गटाला जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले “त्यांचं नाणं…”

दरम्यान, याप्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, प्रवीण महाजन, नितीन कराड, प्रमोद चव्हाणके, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

NCP Crisis : भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडणार; ‘या’ तारखेला घेणार सभा

- Advertisment -

ताज्या बातम्या