Friday, April 26, 2024
Homeनाशिककृषीपंप योजनांचा लाभ घ्यावा : क्षीरसागर

कृषीपंप योजनांचा लाभ घ्यावा : क्षीरसागर

निफाड । प्रतिनिधी Niphad

शेतकरी बांधवांसाठी असलेल्या कृषीधोरणाअंतर्गत शेतकरी बांधवांना एकूण कृषीपंपाच्या थकीत बिलापैकी फक्त 50 टक्केच रक्कम एकदम भरावयाची आहे. उर्वरित 50 टक्के रक्कम ही कायमस्वरूपी माफ होणार आहे. तसेच नवीन वीज जोडणी देखील उपलब्ध होणार आहे. सदर योजना मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असून शेतकरी बांधवानी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले आहे.

- Advertisement -

वीजवितरणच्या विविध योजनेसंदर्भात येथील श्रीलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित शेतकरी मेळाव्यात क्षीरसागर बोलत होते. याप्रसंगी वीजवितरण नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे, उपअधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, निफाडचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे, श्रीलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदलाल चोरडिया, निफाडचे नगरसेवक अनिल कुंदे, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढेपले उपस्थित होते. प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे यांनी केले.

क्षीरसागर पुढे म्हणाले की, वीज बिल थकबाकीची ही चांगली योजना उपलब्ध झाली असून वसूल होणार्‍या रकमेतून स्थनिक स्तरावरील विद्युत यंत्रणा सक्षमीकरण व बळकटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीसाठी शाश्वत वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले,तर नवीन कृषीपंप जोडणीसाठी महावितरणकडून नियोजन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मुख्य अभियंता रंजना पगारे यांनी केले.

अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधत, या योजनेची विस्तृत माहिती दिली व शेतकरी बांधवांनी विचारलेल्या शंकाचे निरसन केले. याप्रसंगी मुख्य अभियंता रंजना पगारे, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे, नगरसेवक अनिल कुंदे, शिवाजी ढेपले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकर्‍यांनी योजनेच्या माध्यमातून 6 लाख 72 हजार रुपये वीज बिलाचा भरणा केला अशा शेतकर्‍यांचा अभियंता रंजना पगारे, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी सत्कार केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या