Friday, April 26, 2024
Homeनगरसूर्याच्या काहिलीत जलतरण तलावाचा गारवा!

सूर्याच्या काहिलीत जलतरण तलावाचा गारवा!

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

उन्हाची तीव्र काहिलीने अंग अक्षरश: भाजुन निघते. अशा या उन्हापासुन काहीसा थंडवा मिळावा म्हणुन नदीत पोहणे, कालव्यात पोहणे व एखाद्या तलावात पोहणे हे आता ग्रामीण भागात ठिकठिकाणी दिसुन येत आहे. शहरी भाग अथवा हॉटैल्स असलेले स्विमींग पूल मध्ये पोहण्यासाठी बालगोपाळांपासुन तर मोठ्यांपर्यंत गर्दी असते. प्रवरा सैनिकी स्कूल अथवा राहाता येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकूलाने खास जलतरण तलावाची निर्मिती केली असल्याने हे दोन्हीही तलाव उन्हाळ्यात खास आकर्षण ठरत आहेत.

- Advertisement -

प्रवरा सैनिकी शाळेचा ऑलम्पिक दर्जा असणारा जलतरण तलाव ऐन कडक उन्हाळ्यात ठरतोय नागरीक व विध्यार्थ्यांना जल तरणासाठी वरदान ठरत आहेत.

लोणी तळेगाव रस्त्यावर सैनिकी शाळेचा 50 मीटर क्षमतेचा ऑलम्पिक दर्जा असणारा जलतरण तलाव आहे. सदर स्वर्गीय पद्ममविभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हा तलाव गेल्या 20 वर्षांपूर्वी साकारला आहे. ग्रामीण भागात अशा पद्धतीचा तलाव हा एकमेव असून राज्य पातळीवर उत्तम दर्जा असणार्‍या तलावांपैकी एक आहे.

कोरोना कालखंडानंतर या तलावास आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नूतनीकरण करण्यात आले. असून सदर पाणी स्वच्छ करण्याचे युनिट यंत्रणा बदलली आहे. शिवाय संपूर्ण पाणी बदल करून नव्याने प्रवरा परिसरातील नागरीक व विद्यार्थी यांच्या सोयी करिता खास उन्हाळ्यात सर्वासाठी खुला केला आहे. सदर तलावात सैनिकी शाळेचे 300 तर 500 पेक्षा जास्त नागरिक राहाता राहुरी संगमनेर या तालुक्यातून अनेक नागरीक येऊन या संधीचा पुरे पूर फायदा घेत आहेत.

अनेक पालक आपल्या मुलांनाही पोहता यावे याकरिता उत्स्फूर्तपणे घेऊन येत आहेत. यामुळे परिसरातील बालक, मुले व जेष्ठ नागरीक ही याचा आस्वाद मनमुराद पणे घेत आहे. या करीता मोलाचे मार्गदर्शन कर्नल भरतकुमार, शाररिक शिक्षण संचालक रमेश दळे याचे लाभत आहे. जलतरण तलाव व्यवस्थापन सुरळीत व्हावे याकरीता जलतरण प्रशिक्षक अखिल शेख, सहाय्यक प्रशिक्षक समीर विखे व जीवन संरक्षक अजित चेचरे, संदीप ईघे अदि काम पाहत आहेत. यामुळे प्रवरा परिसरातील जल तरणप्रेमी मध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

प्रीतीसुधाजी स्कूलने ही विद्यार्थ्यांसाठी अस्तगाव माथ्यावर स्विमींग पुलची उभारणी केली आहे. हा स्विमींग पूल गेल्या तीन महिन्यापासुन विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आल्याचे संस्थापक प्राचार्य इंद्रभान डांगे यांनी सांगितले.

एकेकाळी महाराष्ट्र राज्यात प्रवरे च्या जलतरण पटूचा दबदबा होता.आता त्याहून जास्त सुविधा निर्माण झाली आहे यामुळे नक्कीच प्रवरेचे विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यापुढे दिसतील असा विश्वास आंतरराष्ट्रीय पदक विजेते जलतरण प्रशिक्षक अखिल शेख यांनी व्यक्त केला आहे.

जगातील जलतरण ही सर्वोतम व्यायाम पद्धती असून याची सुविधा लोणी सारख्या ग्रामीण भागात उपलब्ध आहे कोविड नंतर व्यायामाचा अर्थ सर्वाना समजला आहे. याचा फायदा सर्वांनी घेतलाच पाहिजे

– समीर विखे

- Advertisment -

ताज्या बातम्या