Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमुक्ताईनगर : तालुक्यातील विवाहितेचा वापीमध्ये संशयास्पद मृत्यू

मुक्ताईनगर : तालुक्यातील विवाहितेचा वापीमध्ये संशयास्पद मृत्यू

हार्टअटॅकचा बनाव मात्र शरीरावर जखमेच्या खुणा

रावेर  –

पिंप्री-पंचम (ता.मुक्ताईनगर)येथील २३ वर्षीय विवाहित युवतीच्या गुजरात राज्यातील वापी येथे पेपर मिल उभारणीची कंपनी असलेल्या केऱ्हाळे(ता. रावेर)येथील युवकाशी दोन महिन्यापूर्वी झाला होता.या युवतीचे रविवारी दि.३ रोजी पहाटे अकस्मात निधन झाल्याने,नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत पतीसह जेठ-जेठाणी,सासूवर गंभीर आरोप केले आहे.
गुजरात राज्यातील वापीतील छरवाडा येथिल खोडीयार नगरात ही घटना घडली,मयत विवहिता २३ वर्षाची असून,प्रतीक्षा चंदन उर्फ (चेतन)पाटील हे तीच नावं होते.ती मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री-पंचम येथील ज्ञानेश्वर जगन्नाथ महाजन यांची कन्या असून तिचा विवाह २७ फेब्रुवारीला मूळचे केर्हाळे येथील रहिवासी मात्र उद्योगामुळे गुजरात मध्ये स्थायिक झालेल्या सुभाष महाजन या उद्योगपत्याच्या मुलाशी झाला होता.अवघ्या दोनच महिन्यात प्रतीक्षाचा मृत्यू झाल्याने,सदरील मृत्यू नैसर्गिक नसून घातपात घडल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त करत पती चेतन उर्फ चंदन याचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रतीक्षाचा खून केल्याचा आरोप प्रतीक्षा हिचे निंबोल येथील मेहुणे वैभव महाजन यांनी केला आहे.
हार्टअटॅक चा बनाव मात्र शरीरावरील जखमांमुळे संशय बळावला
प्रतीक्षा हिच्या मृत्यू नंतर नातेवाईकांना बऱ्याच उशिराने तिच्या निधनाची बातमी मिळाली,रविवारी पहाटे तिला हार्ट अटॅक आल्याने निधन झाल्याचे सांगण्यात आले मात्र गळ्यावर जखमांचे व्रण दिसत असल्याने  तसेच अंगावर एकही दागिना,मंगळसूत्र सुद्धा नसल्याने नातेवाईकांनी प्रतिक्षाला गळफास देऊन मारून टाकल्याचा आरोप केला आहे.तिचे व्हिडिओ रेकॉर्डिंग लावून शवविच्छेदन केले असल्याने, पोस्टमॉर्टेम अहवालानंतर मरणाचे खरे कारण उलगडणार आहे
खासदार रक्षा खडसे यांची मदत
खासदार रक्षा खडसे यांना याबाबत प्रतीक्षाच्या नातेवाईकांनी माहिती दिल्यावर त्यांनी वापी क्षेत्राचे खासदार व प्रशासन यांच्याशी बोलून प्रतीक्षाच्या कार्यदेशीर प्रक्रिया तातडीने निटपरा करून मृतदेह नातेवाईक यांच्याकडे सुपूर्द केल्याने,पिंप्री पंचम येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- Advertisment -

ताज्या बातम्या