Wednesday, April 24, 2024
Homeनगररात्री संशयितरित्या फिरणार्‍या दोघांना पकडले

रात्री संशयितरित्या फिरणार्‍या दोघांना पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रात्रीच्या वेळी संशयितरित्या फिरणार्‍या दोघांना कोतवाली पोलिसांच्या गस्ती पथकाने पकडले. सादीक रशीद सय्यद (वय 22 रा. बुरूडगाव रोड, भोसले आखाडा), संदीप शिवाजी धायमुकटे (वय 35 रा. भोसले लॉन, वाकोडी रोड) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत.

- Advertisement -

त्यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांची दुचाकी जप्त केली आहे. पोलीस अंमलदार अतुल काजळे यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री मार्केटयार्डजवळील नवजीवन हॉस्पिटलजवळ ही कारवाई करण्यात आली. अंमलदार काजळे व होमगार्ड सागर दरेकर हे मंगळवारी रात्री गस्तीवर होते. ते पहाटे चार वाजता मार्केटयार्ड परिसरातून जात असताना त्यांना नवजीवन हॉस्पिटलजवळ दोन जण संशयितरित्या फिरताना दिसून आले.

पोलिसांना पाहताच त्यांनी त्यांची दुचाकी लपविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी काही एक उपयुक्त माहिती न दिल्याने त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दुचाकी जप्त केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या